'अ‍ॅनिमल'ची रीत खऱ्या आयुष्यात आहे बोल्ड; रणबीरच्या ऑनस्क्रीन बहिणीचे ग्लॅमरस फोटो चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2023 12:38 PM2023-12-07T12:38:19+5:302023-12-07T12:44:10+5:30

Saloni batra: सलोनी तिच्या लूककडे कटाक्षाने लक्ष देते. त्यामुळे ती प्रत्येक फॅशन बिनधास्तपणे कॅरी करताना दिसते.

सध्या बॉलिवूडमध्ये संदीप रेड्डी वांगा यांचा 'अ‍ॅनिमल' हा सिनेमा चर्चेत आहे. सिनेमा रिलीज झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच त्याने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे.

सध्या हा सिनेमा वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत आहे. यात सिनेमात रणबीरच्या बहिणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सलोनी बत्रा चर्चेत आली आहे.

अ‍ॅनिमल या सिनेमात अभिनेत्री सलोनी बत्रा हिने रीत ही भूमिका साकारली आहे. सिनेमात सलोनीने एका साध्या, सोज्वळ मुलीची भूमिका साकारली आहे. मात्र, खऱ्या आयुष्यात ती खूपच ग्लॅमरस आहे.

सलोनी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे कायम तिचे फोटो, व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते.

सध्या नेटकऱ्यांमध्ये तिच्या ग्लॅमरस लूकची चर्चा होतीये. अनेक जण तिचा हॉट अंदाज पाहून चकित झाले आहेत.

सलोनी तिच्या लूककडे कटाक्षाने लक्ष देते. त्यामुळे ती प्रत्येक फॅशन बिनधास्तपणे कॅरी करताना दिसते.

सलोनीने २०१८ मध्ये तिच्या करिअरची सुरुवात केली. सोनी या नेटफ्लिक्स मुव्हीमधून तिने कलाविश्वात पदार्पण केलं.

सलोनीने 'तैश', 'उलझन' आणि '200 हल्ला हो' या सिनेमात काम केलं आहे. तर, या व्यतिरिक्त ती 'लाइफ सही है' या वेबसीरिजमध्येही झळकली आहे.