ब्रेकअपनंतर सुशांत सिंग राजपूतसोबत बोलत नव्हती अंकिता लोखंडे, स्वतःच केला होता खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2020 16:54 IST2020-06-29T16:54:51+5:302020-06-29T16:54:51+5:30

सुशांत सिंग राजपूतच्या निधनाच्या धक्क्यातून अद्याप सावरलेले नाहीत. अंकिता लोखंडेची चाहते सारखी आठवण काढत आहेत.
अंकिता व सुशांत सहा वर्षे एकमेकांना डेट करत होते.
एका मुलाखतीत अंकिता लोखंडेने सुशांतसोबतच्या नात्याबद्दल खुलासा केला होता की त्या दोघांमध्ये बातचीत होत नाही.
मणिकर्णिकाच्या वेळी अंकिताने स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की,तिच्यात व सुशांतमध्ये टॉकिंग टर्म्स नाहीत.
अंकिता व सुशांतने त्यांचे नाते संपविताना एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले नव्हते.
एका मुलाखतीत अंकिताने सांगितले होते की आता ब्रेकअपमधून बाहेर पडले आहे आणि आता तितके कठीण वाटत नाही.
सुशांतसोबत रियुनिटबद्दल बोलताना अंकिता म्हणाली होती की आता हे शक्य नाही. काही लोक ब्रेकअपनंतर सुद्धा मित्र राहतात पण आता ते शक्य नाही.