कुठे आहे माधुरीची डुप्लिकेट अंतरा माळी? वडिलांची जबाबदारी झटकली; आता जगतेय असं आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 01:42 PM2024-01-30T13:42:18+5:302024-01-30T13:54:22+5:30

अंतरा माळीच्या आयुष्यातील 'या' गोष्टी माहितीयेत का?

मनोरंजनविश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या एकाएकी इंडस्ट्रीतून गायब झाल्या आहेत. राम गोपाल वर्मांच्या अनेक सिनेमात काम करणारी अभिनेत्री अंतरा माळी (Antara Mali) आठवतेय का? 'मै माधुरी दीक्षित बनना चाहती हूँ' मधून ती लोकप्रिय झाली होती.

अंतरा माळीने 1998 साली आलेल्या 'ढूँढते रह जाओगे' मधून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. तिने 'मस्त','रोड','नाच','गायब','डरना मना है' अशा काही सिनेमांमध्ये काम केलं आहे. शिवाय तिने काही तमिळ आणि मल्याळम चित्रपटही केले.

2005 साली आलेल्या 'मिस्टर या मिस' सिनेमानंतर तिने फिल्म इंडस्ट्री सोडली. अंतराने स्वत: सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं होतं. मात्र हा सिनेमा बॉक्सऑफिसवर वाईट पद्धतीने आपटला. यानंतर मात्र अंतरा मनोरंजनविश्वातून गायबच झाली.

अचानक 5 वर्षांनी 2010 मध्ये पुन्हा एकदा एका सिनेमात भूमिका साकारली. अमोल पालेकर यांच्या 'एंड वन्स अगेन' या सिनेमात तिने साध्वीची भूमिका केली होती. यासाठी तिने मुंडनही केलं होतं. तिचा लूक पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या.

मात्र या सिनेमावेळी तिने सांगितलं की,"हा माझा कमबॅक सिनेमा नाही. मी 'मिस्टर या मिस'नंतर रिटायर झाले होते. मला जे करायची इच्छा होती ते मी करु शकले नाही. मी अजिबातच पॉझिटिव्ह नव्हते माझी काम करायची इच्छा नव्हती.'

ती पुढे म्हणाली,'आपण सगळेच अशा परिस्थितीतून जातो. मी आतासुद्धा परत येण्यासाठी तयार नाही. एंड वन्स अगेन हा फक्त एकच सिनेमा मी करत आहे. यापुढे कोणताही सिनेमा करणार नाही.'

अंतराने 2009 मध्ये गुपचूप लग्न केले होते. जीक्यू पत्रिकाचे संपादक चे कुर्रियनसह ती लग्नबंधनात अडकली. 2012 मध्ये तिने लेकीला जन्म दिला अंतराने कायम तिचं वैयक्तिक आयुष्य गुलदस्त्यात ठेवलं.

अंतरा माळी ही प्रसिद्ध फोटोग्राफर जगदीश माळी यांची मुलगी आहे. त्यांनी रेखा पासून ते अनेक सेलिब्रिटींचे फोटोशूट केले होते. 2013 मध्ये ते रस्त्यावर भिकाऱ्याच्या अवस्थेत सापडले होते. तेव्हा अंतराने त्यांची जबाबदारी घेण्यास नकार दिला अशी चर्चा होती.

अभिनेत्री मिकीला जगदीश माळी अंधेरी भागात दिसले. तिने सलमान खानला मदतीसाठी फोन केला. सलमानने त्यांना कार पाठवली. तसंच रुग्णालयातही दाखल केले. त्यांची मानसिक परिस्थिती ठीक नव्हती. त्याच वर्षी त्यांचं निधनही झालं. अंतरा मात्र कधीच यावर स्पष्ट बोलली नाही. इंडस्ट्रीपासून दूर ती तिच्या संसारात मग्न आहे.