विराट कोहलीच्या आधी कोणत्या क्रिकेटपटूसोबत रिलेशनशिपमध्ये होती अनुष्का शर्मा? नाव वाचून धक्का बसेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 12:37 IST2025-01-13T12:20:17+5:302025-01-13T12:37:09+5:30

विराटपूर्वी अनुष्कासोबत नाव जोडण्यात आलेल्या एका क्रिकेटपटूबद्दल जाणून घ्या...

भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli ) आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांची प्रेमकहाणी सर्वश्रुत आहे.

क्रिकेट असो वा बॉलिवूड दोन्हीकडे या जोडप्याची चर्चा होत असते. दोघेही कायम चाहत्यांना कपल गोल्स देताना दिसतात. त्याचं खासगी आयुष्यही चर्चेचा विषय ठरतं.

विराटशी लग्न करण्यापुर्वी अनुष्काचं नाव कथितरीत्या अभिनेता रणवीर सिंगसोबतही जोडलं गेलं होतं. त्याची चर्चाही झाली होती.

पण, खूप कमी जणांना माहितेय की, विराटच्या प्रेमात पडण्याआधीही अनुष्कानं एका क्रिकेटपटूला डेट केलं होतं.

अनुष्का ही विराटच्या आधी भारतीय क्रिकेटपटूसोबत रिलेशनशिपमध्ये होती, अशी चर्चा आहे. तो क्रिकेटपटू लोकप्रियतेच्या बाबतीत विराटला चांगलीच टक्कर देतो.

अनुष्का शर्माचं नाव प्रसिद्ध क्रिकेटर सुरेश रैनासोबत (Suresh Raina) जोडलं गेलं होतं.

'आप की अदालत' या शोमध्ये सुरेश रैनाला अफेअर आणि रिलेशनशीपबद्दल विचारण्यात आलं होतं. यावेळी अनुष्काचं नाव घेत त्याला प्रश्न विचारण्यात आला होता. यावर तो गालातल्या गालात लाजताना दिसला होता. पण, दोघांनीही या अफवांवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. नंतर दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे गेले.

मॉडेलिंगच्या काळात अनुष्कानं मॉडेल जोहेब यूसुफ (Zoheb Yusuf) याला डेट केलं होतं. त्यानंतर अनुष्काचं नाव अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh), अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) सोबतही जोडलं गेलं होतं. तर अभिनेता अर्जून कपूरदेखील (Arjun Kapoor) अनुष्काच्या प्रेमात पडल्याची चर्चा होती. पण, अभिनेत्रीनं त्याला नकार दिल्याचं बोललं जातं.

यानंतर अनुष्काच्या आयुष्यात विराट आला. दोघांनी काही वर्ष एकमेंकाना डेट केलं. त्यानंतर ११ डिसेंबर २०१७ रोजी लग्न केलं. लग्नाच्या सात वर्षानंतर आता त्यांना वामिका नावाची गोड मुलगी तर अकाय नावाचा मुलगा आहे.

अनुष्का आणि विराट यांचा सुखाचा संसार सुरू असून ते आपल वैयक्तिक आयुष्य मीडियापासून दूर ठेवाताना पाहायला मिळतात.