पत्रकार बनण्यासाठी आली अन अभिनेत्री झाली, वाचा इंटरेस्टींग स्टोरी By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 07:10 PM 2021-05-01T19:10:53+5:30 2021-05-01T19:21:39+5:30
विविध सिनेमातून अनुष्का शर्माने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे.तिच्या चेह-यावरील निरागसपणा, आकर्षक आणि घायाळ करणारं सौंदर्य यामुळे अनुष्काने रसिकांवर वेगळीच जादू केली आहे. अभिनेत्री म्हणून इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण करणारी अनुष्काला अभिनेत्री बनायचे नव्हते.
अनुष्काला अभिनयात अजिबात रस नव्हता. पत्रकार बनण्याचे तिचे स्वप्न होते.
पत्रकार बनण्यासाठीच ती मुंबईत आली होती.
मुंबईत शिक्षण घेत असताना मॉडलिंग क्षेत्रातील काही मुलींशी तिची मैत्री झाली.
त्यांनी तिला देखील मॉडलिंग करण्याचा सल्ला दिला.
सुरुवातीला मजा मस्ती म्हणून अनुष्काने मॉडेलिंग करायला सुरुवात केली.
दरम्यान तिला एका तेलाची जाहिरात करण्याची ऑफर मिळाली .
त्यानंतर विविध प्रकारच्या जाहिराती करण्याची संधी तिला मिळाली.
बघता - बघता अनुष्काला अभिनयाची आवड निर्माण झाली.
2008 साली 'रब ने बना दी जोडी' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
आज ती यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत गणली जाते, इतकेच नाही तर निर्माती देखील बनली आहे.