तुम्हाला माहिती आहे का ?, अरबाज खान नाही तर मलायका अरोरानेच केलं होतं त्याला लग्नासाठी प्रपोज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 06:19 PM2021-03-12T18:19:56+5:302021-03-12T19:07:43+5:30

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा पर्सनल लाईफला घेऊन जास्त चर्चेत असते. मलायका सध्या अर्जुन कपूरला डेट करते आहे. याआधी मलायकाचे लग्न अरबाज खानसोबत झाले होते. (Photo Instagram)

अरबाज आणि मलायकाची लव्हस्टोरी एखाद्या सिनेमाच्या लव्हस्टोरी इतकीच इंटरेस्टिंग आहे. दोघांची पहिली भेट 1993मध्ये एका बोल्ड फोटोशूट दरम्यान झाली होती. (Photo Instagram)

कॉफी ब्रँडच्या जाहिरातीचे हे फोटोशूट होते, त्याचदरम्यान ते दोघेही एकमेकांवर फिदा झाले. बघताच क्षणी दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. (Photo Instagram)

कॉफी फोटोशूटनंतर दोघांनी एकमेकांस डेट करण्यास सुरवात केली. पाच वर्षांच्या डेटिंगनंतर मलायकाने अरबाजला लग्नासाठी प्रपोज केले. (Photo Instagram)

मलायकाने एका मुलाखतीत सांगितले होते की, "आम्ही दोघांना एकाच वेळी एकमेकांबद्दल असलेली फिलिंग लक्षात आली,आम्ही लग्न केले पाहिजे असे मला वाटले. अरबाजने मला प्रपोज केले नाही. (Photo Instagram)

१२ डिसेंबर 1998रोजी पाच वर्षांच्या डेटिंगनंतर मलायका आणि अरबाजने दोन पद्धतीने लग्न झाले. (Photo Instagram)

लग्नाच्या चार वर्षानंतर 2002मध्ये अरबाज आणि मलायकचा मुलगा अरहानचा जन्म झाला. अरहान आता 18 वर्षांचा झाला आहे. (Photo Instagram)

लग्नाच्या 17 वर्षानंतर मलायका-अरबाजच्या नात्यात दुरावा आला आणि त्यांचा घटस्फोट झाला. या दोघांच्या घटस्फोटाविषयी ऐकून त्यांच्या कुटुंबाला आणि मित्र परिवाला धक्का बसला होता. (Photo Instagram)