Kuttey 2022: विशाल भारद्वाजचा 'कुत्ते' चित्रपट या दिवशी येणार भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2022 18:01 IST2022-07-16T18:01:45+5:302022-07-16T18:01:45+5:30

निर्माता-दिग्दर्शक विशाल भारद्वाजचा 'कुत्ते' हा चित्रपट ४ नोव्हेंबरला देशभरात प्रदर्शित होणार आहे.
'कुत्ते' या चित्रपटातून भारद्वाज यांचा मुलगा आसमान भारद्वाज दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. चित्रपटाची कथा पिता-पुत्राने लिहिली आहे.
'कुत्ते' चित्रपटात अर्जुन कपूर, कोंकणा सेन शर्मा, नसीरुद्दीन शाह, तब्बू आणि राधिका मदन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
विशाल भारद्वाज यांनी शुक्रवारी रात्री त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर 'कुत्ते'च्या रिलीजची तारीख जाहीर केली.
त्यांनी लिहिले आहे, 'कुत्ते' ४ नोव्हेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अर्जुन कपूर, कोंकणा सेन, नसीरुद्दीन शाह, कुमुद मिश्रा, राधिका मदन, शार्दुल भारद्वाज आणि तब्बू मुख्य भूमिकेत आहेत.
दिग्दर्शन आसमान भारद्वाजने केले आहे.