एकाच घरातील दोन मुलींच्या प्रेमात होता 'हा' अभिनेता, आता एकाकी पडला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 17:48 IST2025-04-08T17:36:43+5:302025-04-08T17:48:17+5:30

एक कलाकार आहे, ज्यानं एकाच घरातील दोन जणींना डेट केलं होतं.

बॉलिवूडमध्ये अनेक दिग्गज कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यातील प्रसंग चर्चेचा विषय राहिले आहेत. असाच एक कलाकार आहे, ज्यानं एकाच घरातील दोन जणींना डेट केलं होतं.

तो आभिनेता दुसरा तिसरा कुणी नाही तर अर्जून कपूर. त्यानं आधी नणंदेला आणि मग वहिनीला डेट केलं. पण, नाती तो टिकवू शकला नाही. अखेर आज तो सिंगल आहे.

एकेकाळी अर्जुन कपूर सलमान खानच्या कुटुंबाच्या खूप जवळ होता. त्यावेळी अर्जुन कपूर सलमानची बहीण अर्पिता खानला डेट करत होता.

अर्जुन हा वयाच्या १८ व्या वर्षी अर्पिताच्या प्रेमात पडला होता. पण, दोघांचं नात टिकलं नाही.

अर्पितानंतर अर्जून अर्पिताची वहिणी असलेली मलायका हिच्या प्रेमात पडला.

अरबाजपासून घटस्फोट झाल्यानंतर मलयका आणि अर्जुन यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करून आपलं प्रेम जगजाहिर केलं.

दोघांच्या वयात १२ वर्षांचा फरक होता. अर्जुन कपूरचे मलायका अरोरासोबतचं नातं फार काळ टिकू शकले नाही.

जेवढी दोघांच्या रिलेशनशिपची चर्चा रंगली होती. तेवढंच त्यांच्या ब्रेकअपनं लक्ष वेधलं. लग्नावरुन त्यांच्यात वाद झाल्याचं बोललं जातं.

सध्या अर्जून कपूर सिंगल आहे. त्याने करिअरवर लक्ष केंद्रित केलं आहे. अलिकडेच त्याचा 'Mere Husband Ki Biwi' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.