आशिष विद्यार्थीच्या दुसऱ्या पत्नीचंही झालंय पहिलं लग्न; एका मुलीची आहे आई
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2023 13:53 IST2023-05-30T13:47:34+5:302023-05-30T13:53:42+5:30
Rupali barua:आशिष यांच्या दुसऱ्या पत्नीचं नाव रुपाली असून ती एक प्रसिद्ध उद्योजिका आणि सोशल मीडिया स्टार आहे.

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आशिष विद्यार्थी यांनी अलिकडेच वयाच्या ५७ व्या वर्षी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली.
आशिष यांनी रुपाली बरुआ यांच्यासोबत दुसरं लग्न केलं आहे. तेव्हापासून या दोघांची सोशल मीडियावर चर्चा रंगलीये.
विशेष म्हणजे आशिष यांच्या लग्नाविषयी सध्या वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत.
यात आशिष विद्यार्थी यांची दुसरी पत्नी नेमकी कोण आहे? ती काय करते असे प्रश्न नेटकऱ्यांना पडले आहेत.
आशिष यांच्या दुसऱ्या पत्नीचं नाव रुपाली असून ती एक प्रसिद्ध उद्योजिका आणि सोशल मीडिया स्टार आहे.
रुपाली यांचं पहिलं लग्न झालं आहे. तसंच त्यांना एक मुलगीदेखील आहे.
रुपाली यांच्या पहिल्या पतीचं नाव मीतम बरुआ असं असून त्यांचं निधन झालं आहे.
पतीच्या निधनानंतर रिपाली मुलीसह लंडन सोडून भारतात परतली आणि तिने क्लोदिंग ब्रँड सुरु केला.
रुपाली बऱ्याचदा तिच्या लेकीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
रुपाली बरुआची एकूण संपत्ती ८ कोटी रुपये इतकी आहे.