Athiya Shetty Wedding Lehenga: मग, पोरगी कुणाची!... अथियाचा लेहंगा शिवायला लागले १०००० तास; रिसेप्शनचा शराराही 'लीक'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 01:52 PM2023-01-24T13:52:58+5:302023-01-24T14:01:25+5:30

Athiya Shetty Wedding: लग्न आता झाले असले तरी अथिया आणि राहुल लगेचच हनिमूनला जाणार नाहीएत. अथिया तिचे प्रोजेक्ट पूर्ण करेल आणि राहुल आयपीएल हंगाम...

बॉलिवूडचा अण्णा सुनिल शेट्टीची मुलगी अथिया शेट्टीचे काल खंडाळ्यामध्ये क्रिकेटर केएल राहुलशी लग्न झाले. लग्न आता झाले असले तही अथिया आणि राहुल लगेचच हनिमूनला जाणार नाहीएत. अथिया तिचे प्रोजेक्ट पूर्ण करेल आणि राहुल आयपीएल हंगाम, त्यानंतरच ते रिसेप्शन देखील ठेवणार आहेत. कालच्या लग्नाला फक्त ६७ पाहुण्यांना निमंत्रण होते. रात्री दोघांच्या लग्नाचे फोटो समोर आले होते.

सुनिल शेट्टीच्या फार्महाऊसवर हे लग्न झाले. पाहुण्यांनी फोटो व्हायरल करू नये म्हणून त्यांच्या मोबाईलच्या कॅमेरांना पट्ट्य़ा मारण्यात आल्या होत्या. परंतू, अथियाचे लग्नावेळचे फोटो आल्यानंतर अनेकांच्या नजरा या तिच्या वेडिंग गाऊनवर खिळल्या होत्या.

पेस्टल पिंक कलरचा लहंगा तिने खास बनवून घेतला होता. खुद्द राहुल देखील त्यावर कॉम्प्लिमेंट देताना दिसत होता. अथियाचा लेहंगा अनुष्का शर्माच्या नवरीच्या वेषाची आठवण करून देत होता.

अथिया शेट्टीने तिच्या इंस्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर केले आणि केएल राहुलवर तिचे प्रेम व्यक्त केले आणि सर्वांचे आभार मानले. वधूचा लेहेंगा फॅशन डिझायनर अनामिका खन्ना यांनी डिझाइन केला होता. या लेहेंग्यात अथियाचे सौंदर्य खुलून दिसत होते.

अथियाच्या या लेहेंग्यावर सुरेख एम्ब्रॉयडरी करण्यात आली होती. हा लेहेंगा बनवण्यासाठी दहा हजार तास लागले. दिवसात मोजायचे झाले तर ४१६ दिवस लागले होते. म्हणजे अथियाचे लग्न सुनिल शेट्टीने सुमारे दीड वर्ष आधीच प्लॅन केले होते. लेहेंग्यावर चिकनकारी वर्क करण्यात आले होते, ज्यामध्ये फ्लोरल पॅटर्नची एम्ब्रॉयडरी दिसत होती.

लेहेंग्यासोबत अथियाने डीप नेकलाइनची फुल स्लीव्ह्ज मॅचिंग क्रॉप चोली परिधान केली होती. ज्यावर हाताने काम केले होते. यावर जरदोजी आणि जाळ्यांचे वर्क दिसत होते. ब्राइडल लुक पूर्ण करताना हसीनाने सिल्क आणि ऑर्गेन्झा फॅब्रिकचा दुपट्टा घातला होता.

दागिन्यांमध्ये पोल्की नेकलेस, मॅचिंग झुमके, कडा सेट आणि एंगेजमेंट रिंग घातली होती. अथियाने तिचा लेहेंगा मॅच करताना तिचा मेकअप खूप हलका ठेवला होता.

आता अथियाच्या या एवढ्या कष्टाच्या लेहंग्याला साजेल असा लुक राहुलला करावा लागला होता. राहुलने क्रीम रंगाची शेरवानी घातली होती. त्याच्या हस्तिदंती कुर्त्याच्या सेटवर सुरेख नक्षीकाम करण्यात आले होते. एक लांब जॅकेट घातला होता आणि मॅचिंग स्टोल सोबत होता. केएलने एमराल्ड नेकपीस घातला होता.