Ayesha Takia's plastic surgery gone wrong? PSC
या अभिनेत्रीची प्लास्टिक सर्जरी फसल्यामुळे करावा लागला बॉलिवूडला रामराम? By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 08:00 AM2020-04-13T08:00:00+5:302020-04-13T12:46:34+5:30Join usJoin usNext आयशा टाकियाने टारर्जन द वन्डर कार या चित्रपटापासून तिच्या करियरला सुरुवात केली. आयशाने अनेक चित्रपटात काम केलेअसले तरी तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ही वाँटेड या चित्रपटामुळे मिळाली आयशाने अधिक सुंदर दिसण्याच्या नादात लिप सर्जरी, आयब्रो व फोरहेड सर्जरी केली. या सर्जरीनंतरच्या नव्या लूकचे फोटो समोर आलेत. तिचे हे फोटो पाहून अनेकांना धक्का बसला होता. चाहत्यांना आयशाचा हा लूक जराही आवडला नाही. अनेकांनी यावरून तिला ट्रोलही केले. अर्थात सर्जरी केल्याचे आयशा नाकारत राहिली. पण तिच्या फोटोंनी सगळे काही स्पष्ट केले. वयाच्या चौथ्या वर्षी आयशाने मॉडेलिंग सुरु केले. वयाच्या १५ व्या वर्षी फाल्गुनी पाठकच्या 'मेरी चूर उड उड जाऐ' या म्युझिक अल्बममध्ये ती झळकली. या अल्बममुळे आयशा अचानक प्रकाशझोतात आली. आयशा दिल मांगे मोर, शादी नंबर १, कॅश, पाठशाला, दे ताली अशा अनेक चित्रपटांत झळकली. पण तिला म्हणावे तसे यश मिळाले नाही. फिल्मी करिअर उतरतीला लागल्यावर आयशाने लग्नाचा निर्णय घेतला. समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांचा मुलगा फरहानसोबत तिने लग्नगाठ बांधली.टॅग्स :आयशा टाकियाAyesha Takia