राम मंदिरासाठी कलाकारांनी उचलला खारीचा वाटा; जाणून घ्या, कोणत्या कलाकाराने कोणत्या गोष्टी केल्या दान
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 14:00 IST2024-01-18T13:54:22+5:302024-01-18T14:00:44+5:30
अनुपम खेर यांनी राम मंदिरासाठी दान केली वीट; तर हेमा मालिनी, अक्षय कुमारने काय दान केलं ते पाहा

२२ जानेवारीला अयोध्येत राम मंदिरात प्रभू रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा संपन्न होणार आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींना खास आमंत्रण देण्यात आलं आहे.
सध्या संपूर्ण देशाचं लक्ष या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याकडे लागलं असून प्रत्येक जण हा दिवस खास करण्यासाठी प्रयत्न करत आहे.
अयोध्येमध्ये राम मंदिराच्या निर्माणासाठी देशातील प्रत्येकाने शक्य होईल त्यानुसार विशिष्ट रक्कम वा वस्तू दान केली आहे. त्यामुळे कोणत्या कलाकाराने नेमकं काय दान केलं आहे हे पाहुयात.
अक्षय कुमार - बॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षय कुमार याने मोठी रक्कम दान केल्याचं सांगण्यात येत आहे. या रक्कमेचा आकडा अद्याप समोर आलेला नाही. मात्र, त्याने स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून मदत केल्याचं सांगितलं.
प्रणिता सुभाष- दाक्षिणात्य आणि बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री प्रणिता सुभाष हिने राम मंदिराच्या उभारणीसाठी १ लाख रुपये दान केले आहेत.
गुरमीत चौधरी- छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता गुरमीत चौधरी यानेही राम मंदिरासाठी ठराविक रक्कम दान करत खारीचा वाटा उचलला आहे. गुरमीतने रामायण या मालिकेत प्रभू श्रीरामांची भूमिका साकारली होती.
मनोज जोशी - बॉलिवूड अभिनेता मनोज जोशी यांनी सुद्धा राम मंदिराच्या निर्माणासाठी आर्थिक मदत केली आहे. त्यांनी एका व्हिडीओमार्फत गुप्तदान केल्याचं सांगितलं आहे.
हेमा मालिनी- बॉलिवूडची ड्रीम गर्ल अर्थात अभिनेत्री हेमा मालिनी यांनी राम मंदिराच्या निर्माणासाठी विशिष्ट रक्कम दान केल्याचं म्हटलं जात आहे. ही रक्कम नेमकी किती आहे याचा अद्याप खुलासा झालेला नाही.
पवन कल्याण - साऊथ स्टार पवन कल्याण याने राम मंदिरासाठी ३० लाख रुपयांची रक्कम दान केली आहे.
मुकेश खन्ना - शक्तिमान फेम अभिनेता मुकेश खन्ना यांनीही राम मंदिराच्या निर्माणासाठी १ लाख ११ हजार १११ रुपये दान केले आहेत.
अनुपम खेर - बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर यांनी राम मंदिरासाठी चक्क एक वीट भेट म्हणून दिली आहे.