Rana Daggubati : मला फक्त एका डोळ्याने दिसतं, किडनीही...., ‘बाहुबली’च्या ‘भल्लालदेव’चा शॉकिंग खुलासा By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 01:35 PM 2023-03-16T13:35:59+5:30 2023-03-16T13:49:46+5:30
Rana Daggubati : ब्लॉकबस्टर हिट ‘बाहुबली’चा भल्लालदेव अर्थात अभिनेता राणा दग्गुबाती याचा या चित्रपटातील अभिनय सगळ्यांनाच सुखावणारा होता. चित्रपटातील भूमिका निगेटीव्ह असली तरी राणाचा अभिनय डोळ्यात भरणारा होता. ब्लॉकबस्टर हिट ‘बाहुबली’चा भल्लालदेव अर्थात अभिनेता राणा दग्गुबाती याचा या चित्रपटातील अभिनय सगळ्यांनाच सुखावणारा होता. चित्रपटातील त्याची भूमिका निगेटीव्ह असली तरी राणाचा अभिनय ठळकपणे डोळ्यात भरला होता.
बाहुबली अर्थात प्रभासच्या तोडीस तोड व्यक्तिरेखा त्याने साकारली होती. याच राणाने आता एक धक्कादायक खुलासा केला आहे. होय, एका ताज्या मुलाखतीत राणा त्याच्या आजारपणाबद्दल बोलला.
मी फक्त डाव्या डोळ्याने पाहू शकतो. माझी एक किडनीही खराब झाली होती. त्याचं ट्रान्सप्लांट झालं आहे, असं त्याने सांगितलं. हे ऐकून त्याच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला.
‘द बॉम्बे जर्नी’ला दिलेल्या मुलाखतीत राणा आजारपणावर बोलला. राणा म्हणाला, “आईला दिसत नाही, हे समजल्यावर त्या शोमधील मुलाला फार वाईट वाटलं होतं. तेव्हा मी तेव्हा पहिल्यांदाच माझ्या उजव्या डोळ्याबद्दल बोललो होतो. मला उजव्या डोळ्याने दिसत नाही, हे मी त्या मुलाला सांगितलं. मी उजव्या डोळ्याने पाहू शकत नाही, म्हणून मी वेगळ्या पद्धतीने काम करतो”.
माझा उजवा डोळा काम करत नाही. मी फक्त डाव्या डोळ्याने बघू शकतो. एका माणसानं मृत्यूपश्चात मला त्याचे डोळे दान केले होते. पण आत्ताही मी डावा डोळा बंद केला तर मला काहीही दिसत नाही, असं राणा म्हणाला.
शारिरीक समस्यांमुळे लोक कोलमडतात. माझ्यावर कॉर्नियल ट्रान्सप्लांट झालं, माझं किडनी ट्रान्सप्लांट झालं. जणू मी एक टर्मिनेटर आहे, असं मला अनेकदा वाटतं. पण अद्यापही मी हार मानलेली नाही, असं त्याने सांगितलं.
याआधी सामंथा रूथ प्रभुच्या एका चॅट शोमध्येही राणा आपल्या आजारपणाबद्दल बोलला होता. ‘आयुष्य फास्ट फॉरवर्ड सुरु असताना अचानक एक पॉज बटण दाबल्या जातं. माझ्या आयुष्यातही असंच काही घडल्याचं तो म्हणाला होता.
मला बीपी होता. हृदयाच्या चारही बाजूंना कॅल्सिफिकेशन होते. किडनी फेल होत होती. हॅमरेजचा 70 टक्के चान्स होता आणि जीव जाण्याचा धोका 30 टक्के होता, असं त्याने सांगितलं होतं.
२०१९ च्या जुलै महिन्यात राणाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात तो प्रचंड अशक्त आणि आजारी दिसला होता. राणावर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली, अशी चर्चा त्यावेळी होती. मात्र तेव्हा राणाने किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्याच्या चर्चा धुडकावून लावल्या होत्या.