बाळासाहेबांचा नातू करणार बॉलिवूड डेब्यू, अनुराग कश्यपच्या सिनेमातून येणार घेणार एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 10:58 IST2025-01-30T10:38:25+5:302025-01-30T10:58:32+5:30

बाळासाहेब ठाकरे यांचा नातू बॉलिवूड गाजवणार.

ठाकरे कुटुंब ( Balasaheb Thackeray) हे महाराष्ट्र राज्यातील सर्वात प्रसिद्ध आणि शक्तिशाली राजकीय कुटुंबांपैकी एक आहे.

आता ठाकरे कुटुंबातील एक सदस्य राजकारणात नाही तर थेट बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेणार आहे.

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा नातू ऐश्वर्य ठाकरे (Aaishvary Thackeray) लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करत असल्याची माहिती आहे.

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा नातू ऐश्वर्य ठाकरे (Aaishvary Thackeray) लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करत असल्याची माहिती आहे.

ऐश्वर्य गेल्या काही वर्षांपासून सिनेइंडस्ट्रीत काम करतोय. त्यानं संजय लीला भन्साळी यांच्या 'बाजीराव मस्तानी' चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिले होते.

ऐश्वर्य हा फिल्ममेकर अनुराग कश्यप यांच्या सिनेमात झळकणार आहे. सिनेमाचं शुटिंग पुर्ण झाल्याची माहिती आहे.

आगामी काळात तो मोठ्या घोषणा करण्याच्या तयारीत असल्याचंही म्हटलं जात आहे. सिनेमाचं नाव काय आहे, यावर अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

ऐश्वर्य हा बाळासाहेबांचे पुत्र जयदेव ठाकरे आणि त्यांची पत्नी स्मिता ठाकरे यांचा धाकटा मुलगा आहे. महाराष्ट्राची माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्याचे काका आहेत.

स्मिता ठाकरे हे सिनेइंडस्ट्रीतलं लोकप्रिय नाव आहे. स्मिता यांनी 'हसिना मान जाये' या सिनेमाची निर्मिती केली होती. त्यांनी हिंदी आणि मराठी मालिकांचीही निर्मिती केली आहे.

स्मिता ठाकरे (Smita Thackeray) हे सिनेइंडस्ट्रीतलं लोकप्रिय नाव आहे. स्मिता यांनी 'हसिना मान जाये' या सिनेमाची निर्मिती केली होती. त्यांनी हिंदी आणि मराठी मालिकांचीही निर्मिती केली आहे.

स्मिता ठाकरे यांनी १९८६ मध्ये जयदेव ठाकरेंसोबत (Jaidev Thackeray)लग्नगाठ बांधली. परंतु, काही कारणांमुळे २००४ साली ते विभक्त झाले.

ऐश्वर्यचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्याच्या फोटोंना नेटकऱ्यांची पसंती मिळताना दिसते.