Bappi Lahiri Death : जेव्हा बप्पी लहरी यांना बघून त्यांचा फॅन झाला होता मायकल जॅक्सन, म्हणाला होता - तुमचं 'ते' गाणं आवडतं मला! By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 10:09 AM 2022-02-16T10:09:17+5:30 2022-02-16T10:29:03+5:30
Bappi Lahiri Passes Away : प्रसिद्ध संगीतकार बप्पी लहरी यांचं वयाच्या ६९ वर्षीय मुंबईत निधन झालं. बऱ्याच दिवसांपासून ते आजारी असल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. प्रसिद्ध संगीतकार बप्पी लहरी यांचं वयाच्या ६९ वर्षीय मुंबईत निधन झालं. बऱ्याच दिवसांपासून ते आजारी असल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांना सोशल मीडियावर त्यांचे फॅन्स श्रद्धांजली वाहत आहेत. सोबतच त्यांच्यासंबंधी किस्स्यांचीही चर्चा होत आहे. असाच एक किस्सा आहे बप्पी लहरी आणि मायकल जॅक्सन यांचा.
जेव्हा मायकल जॅक्सन बप्पी लहरी यांना पहिल्यांदा भेटला तेव्हा तो त्यांचा फॅन झाला होता. त्याचं कारण होतं त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने. चला जाणून घेऊ काय होत तो किस्सा....
मीडिया रिपोर्टनुसार, मायकल जॅक्सन एकदा मुंबईत शो करण्यासाठी आला होता. त्यावेळी बप्पी लहरी आणि त्याची भेट झाली होती. बप्पी लहरी यांनी द कपिल शर्मा शोमध्ये हा किस्सा सांगितला होता. ते म्हणाले होते की, 'तो मुंबईला आला होता. त्यावेळी मी एका ठिकाणी बसलो होो. मायकल जॅक्सन माझ्या जवळ आला तेव्हा त्याची नजर माझ्या गणपती असलेल्या चेनवर पडली. तो म्हणाला होता की, माय गॉड फन्टास्टिक. तुमचं नाव काय आहे? तुमची चेन तर कमाल आहे.
बप्पी लहरी म्हणाले होते की, बोलताना मायकल जॅक्सनने माझं पूर्ण नाव विचारलं. त्यानंतर त्याचा दुसरा प्रश्न होता की, तुम्ही कम्पोजर आहात का? मी हो म्हणालो. मी डिस्को डान्सर कंपोज केलं आहे. बप्पी म्हणाले की, मी जेव्हा त्याला डिस्को डान्सर सांगितलं तेव्हा मायकल जॅक्सन बोलला की, मला तुझं जिम्मी जिम्मी गाणं आवडतं.
बप्पी लहरी हे बॉलिवूडचे 'गोल्ड मॅन' म्हणून ओखळले जातात. त्यांनी बॉलिवूडला अनेक सुपरहिट आणि वेगळ्या धाटणीची गाणी दिली. त्यांच्या गाण्यांना वेस्टर्न टच होता. जे तरूणांना त्यावेळी फार आवडत होते. डिस्को डान्सर, आणि जिम्मी जिम्मीसारखी गाणी आजही लोकप्रिय आहेत. हेच कारण आहे की, मायकल जॅक्सनही बप्पी लहरी यांच्या गाण्याचा फॅन होता.
बप्पी दा यांनी जवळपास 48 वर्षे आपल्या गाण्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या हृदयात आपलं स्थान निर्माण केले. जवळपास 500 चित्रपटांमध्ये त्यांनी 5000 हून अधिक गाणी संगीतबद्ध केली आणि गायली. बप्पी दा त्याच्या संगीत कारकिर्दीव्यतिरिक्त आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत असायचे. त्यांना सोन्याचे दागिने घालण्याची खूप आवड होती. एका मुलाखतीत त्याने यामागचे कारणही सांगितले.
बप्पी दा म्हणाले होते की, ते अमेरिकन स्टार एल्विस प्रेस्लीचा खूप मोठे चाहते होते. त्यांनी एल्विसला प्रत्येक परफॉर्मन्समध्ये सोन्याची चेन घातलेला पाहिले होते. तेव्हा बप्पी दा त्यांच्या संघर्षाच्या टप्प्यात होते आणि त्यांनी निश्चय केला होता की ते यशस्वी झाल्यावर खूप सोनं घालणार आहेत. ज्यावेळी ते यशस्वी झाला तेव्हा त्यांनी इतकं सोनं अंगावर घातलं की त्यांची ओळख भारताचा गोल्ड मॅन म्हणून झाली.
बप्पी दा यांच्या म्हणण्यानुसार, सोनं त्यांच्यासाठी खूप भाग्यवान ठरले, म्हणून त्यांनी ते घालणे कधीच सोडले नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बप्पी दा यांच्याकडे सुमारे 50 लाखांचे सोने होते. त्यांची एकूण संपत्ती सुमारे 20 कोटी रुपये आहे.
बप्पी दांप्रमाणेच त्यांची पत्नी चित्रानी यांनाही सोनं आणि हिऱ्यांची आवड आहे. 2014 मध्ये, त्यांनी सांगितले की त्यांच्याकडे बप्पी दापेक्षा जास्त 967 ग्रॅम सोने, 8.9 किलो चांदी आणि 4 लाख रुपये जास्त किंमतीचे हिरे आहेत.