भाग्यश्रीच्या लेकीने आजपर्यंत आईचा ‘मैंने प्यार किया’ हा सिनेमा पूर्ण पाहिलेला नाही, पण का?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 04:23 PM2022-02-10T16:23:05+5:302022-02-10T16:29:00+5:30

Bhagyashree daughter Avantika Dassani : भाग्यश्री आणि सलमान खानच्या ‘मैंने प्यार किया’ या सिनेमानं सगळ्यांनाच वेड लावलं होतं. अगदी आजही चाहते या जोडीला मिस करतात. पण भाग्यश्रीची लेक मात्र आईचा हा सिनेमा पूर्ण पाहूच शकली नाही.

भाग्यश्री आणि सलमान खानच्या ‘मैंने प्यार किया’ या सिनेमानं सगळ्यांनाच वेड लावलं होतं. अगदी आजही चाहते या जोडीला मिस करतात. हा रोमॅन्टिक सिनेमा भाग्यश्रीच्या करिअरचा टर्निंग प्वॉइंट ठरला. पण भाग्यश्रीची लेक मात्र आईचा हा सिनेमा पूर्ण पाहूच शकली नाही.

होय, भाग्यश्रीची लेक अवंतिका दासानी हिच्यासाठी आईचा ‘मैंने प्यार किया’ हा सिनेमा पाहणं एक कठीण टास्क होता. खुद्द अवंतिकाने एका मुलाखतीत हा खुलासा केला.

लहान असताना मी ‘मैंने प्यार किया’ हा सिनेमा पाहण्याचा खूपदा प्रयत्न केला. पण कधीच पूर्ण पाहू शकले नाही, असं अवंतिका म्हणाली.

‘मैंने प्यार किया’मधील काही सीन्स मला पाहावले नव्हते. पहिल्यांदा पाहिला तेव्हा तर मी पाहूच शकले नाही. आईला इतक्या दु:खी अवस्थेत पाहूच शकत नव्हते, असं ती म्हणाली.

आईचा पडद्यावरचा दु:खी चेहरा पाहणं शक्य नसल्यानं मी कधीच ‘मैंने प्यार किया’ पूर्ण पाहिला नाही. दरवेळी सिनेमा अर्धवट सोडून मी रूममधून बाहेर पडले, असंही तिने सांगितलं.

भाग्यश्रीची लेक अवंतिका लवकरच अ‍ॅक्टिंग डेब्यू करतेय. मिथ्या या वेबसीरिजमध्ये ती दिसणार आहे.

मिथ्या या सीरिजमध्ये अवंतिका महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. हुमा कुरेशी व परमब्रता चॅटर्जी यात लीड रोलमध्ये आहेत. येत्या 18 तारखेला झी 5 वर ही सीरिज स्ट्रिम होणार आहे.