रवीकिशन ते खेसारीलाल यादव! भोजपुरी कलाकारांचं मानधन किती असतं माहितीये का? By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2022 11:34 AM 2022-01-07T11:34:07+5:30 2022-01-07T11:51:31+5:30
Bhojpuri actors: बॉलिवूड किंवा हॉलिवूड कलाकारांचं मानधन किती असतं याचा अंदाज सगळ्यांनाच आहे. परंतु, भोजपुरी कलाकार एका चित्रपटासाठी किती मानधन घेतात माहितीये का? कलाविश्वातील अनेक कलाकार त्यांच्या लक्झरी लाईफस्टाइल आणि मानधनाच्या मोठ्या रक्कमेमुळे ओळखले जातात. यात साधारणपणे बॉलिवूड किंवा हॉलिवूड कलाकारांचं मानधन किती असतं याचा अंदाज सगळ्यांनाच आहे. परंतु, भोजपुरी कलाकार एका चित्रपटासाठी किती मानधन घेतात माहितीये का? चला तर मग जाणून घेऊयात खेसारीलाल यादव ते रवीकिशनपर्यंत सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांविषयी.
पवन सिंह - भोजपुरी कलाविश्वातील सलमान खान अशी ओळख मिळवणारा अभिनेता म्हणजे पवन सिंह. खासकरुन स्टंटबाजी ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्याचे सोशल मीडियावर १.४ मिलिअन फॉलोअर्स आहेत. हा अभिनेता एका चित्रपटासाठी ४० ते ४५ लाख रुपये मानधन घेतो.
अक्षरा सिंह - बिग बॉस ओटीटीमुळे अक्षरा सिंह खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली. परंतु, भोजपुरी कलाविश्वात तिने तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. अक्षरा एका चित्रपटासाठी २० ते २२ लाख रुपये मानधन घेते. सोशल मीडियावर तिचे चार मिलिअन फॉलोअर्स आहेत.
निरहुआ - दिनेशलाल यादव म्हणजेच निरहुआ हे नाव कोणत्याही प्रेक्षकवर्गासाठी नवीन नाही. २००१ मध्ये बुढवा में दम बा आणि मलाई खाए बुढवा या दोन म्युझिक अल्बममुळे निरहुआ प्रकाशझोतात आला. दिनेशलाल एका चित्रपटासाठी ३५ लाख रुपये मानधन घेतो.
खेसारी लाल यादव- खेसारी लाल यादव याला भोजपुरी सिनेमांमधील शत्रूघ्न सिन्हा म्हटलं जातं. २०२१ मध्ये साजन चले ससुराल या चित्रपटातून त्याने भोजपुरी कलाविश्वात पदार्पण केलं. आज खेसारी लाल एका चित्रपटासाठी ४० लाख रुपये फी घेतो.
आम्रपाली दुबे - अनेक दिग्गज कलाकारांसोबत स्क्रीन शेअर करणारी आम्रपाली एका चित्रपटासाठी २५ ते ३० लाख रुपये मानधन घेते.
रवीकिशन - रवीकिशन हे नाव आता केवळ भोजपुरी सिनेमांपूरतं मर्यादित राहिलेलं नाही. बॉलिवूडमध्येही या अभिनेत्याने आपल्यातील चमक दाखवली आहे. तसंच राजकारणातही सक्रीय सहभाग आहे. रवीकिशन एका चित्रपटासाठी ५० लाख रुपये मानधन घेतात.
मोनालिसा - अनेकदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत राहणारी मोनालिसा एका चित्रपटासाठी १५ ते २० लाख रुपये फी घेते. सोशल मीडियावर तिचे ४.९ मिलिअन फॉलोअर्स आहेत.
काजल राघवानी - बोल्डनेसमुळे चर्चेत येणारी काजल एका चित्रपटासाठी २० ते २५ लाख रुपये घेते.
राणी चटर्जी - राणी चटर्जीने जवळपास २०० पेक्षा जास्त भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ती एका चित्रपटासाठी २० ते २५ लाख रुपये घेते.