Bhool Bhulaiyaa 2 Box Office Collection Day 7: कार्तिक आर्यनचा 'भुलभुलैया २' लवकरच गाठेल १०० कोटींचा आकडा By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 01:02 PM 2022-05-27T13:02:20+5:30 2022-05-27T13:09:28+5:30
Bhool Bhulaiyaa 2: लवकरच 'भूल भुलैया २' हा १०० कोटींची कमाई करणारा २०२२ मधील पाचवा चित्रपट ठरणार आहे. यासोबतच हा कार्तिक आर्यन(Kartik Aaryan)चा आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरणार आहे. लवकरच भूल भुलैया २ हा १०० कोटींची कमाई करणारा २०२२ मधील पाचवा चित्रपट ठरणार आहे. यासोबतच हा कार्तिक आर्यनचा आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरणार आहे.
कार्तिक आर्यनचा चित्रपट भूल भुलैया २ बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन एक आठवडा झाला असून हा चित्रपट १०० कोटींचा आकडा पार करण्याच्या तयारीत आहे.
एका आठवड्याच्या आत, भूल भुलैया २ ला जबरदस्त कमाई करण्याची संधी मिळाली आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडतोय.
तसेच कार्तिक आर्यनच्या भुल भुलैया २ चित्रपटाने कंगना राणौतच्या 'धाकड'ला मागे टाकले आहे. 'धाकड' ६ दिवसात ४ कोटीपर्यंत कमाई करू शकलेला नाही.
दिग्दर्शक अनीस बज्मी यांनी बनवलेल्या भूल भुलैया २ चे सातव्या दिवसाचे कलेक्शन समोर आले आहे. व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांच्या मते, चित्रपटाने गुरुवारी बॉक्स ऑफिसवर ७.२७ कोटींची कमाई केली.
यासह चित्रपटाची एकूण कमाई ९२.०५ कोटींवर गेली आहे. हळूहळू हा चित्रपट १०० कोटींच्या जवळपास वाढत आहे. अशा परिस्थितीत, रिलीजच्या दुसऱ्या आठवड्यात, भूल भुलैया २ लवकरच १०० कोटी क्लबमध्ये एंट्री करेल असे मानले जात आहे.
जबरदस्त कॉमेडी, मजेदार संवाद आणि धडकी भरवणाऱ्या भूल भुलैया २ चित्रपटाचा प्रेक्षक आनंद घेत आहेत. चित्रपट पहिल्या दिवसापासून चांगली कमाई करत आहे.
चित्रपटाने शुक्रवारी १४.११ कोटी रुपये, शनिवारी १८.३४ कोटी रुपये, रविवारी २३.५१ कोटी रुपये, सोमवारी १०.७५ कोटी रुपये, मंगळवारी ९.५६ कोटी रुपये आणि बुधवारी ८.५१ कोटी रुपये कमावले.
लवकरच भूल भुलैया २ वर्ष २०२२ मधील पाचवा चित्रपट ठरणार आहे. जो १०० कोटींची कमाई करेल. यासोबतच हा कार्तिक आर्यनचा आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरणार आहे.