Bhool Bhulaiyaa 2 Day 3 box office: कार्तिक आर्यनचा चित्रपट 'भुल भुलैया २'नं ३ दिवसात जमवला ५६ कोटींचा गल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 18:34 IST2022-05-23T18:34:31+5:302022-05-23T18:34:31+5:30

Bhool Bhulaiyaa 2 : कार्तिक आर्यनचा चित्रपट 'भुल भुलैया २'ला प्रेक्षकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे.

अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री कियारा आडवाणीच्या हॉरर कॉमेडी भूल भुलैया २ रिलीज झाल्यानंतर पहिल्या तीन दिवसांत ५५.९६ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

चित्रपटाच्या निर्मात्यांनी सोमवारी ही माहिती दिली. हा चित्रपट शुक्रवारी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री विद्या बालन यांचा २००७ मध्ये प्रदर्शित झालेला 'भूल भुलैया' हा हॉरर कॉमेडी चित्रपट होता.

शुक्रवारी प्रदर्शित झालेला हा चित्रपट त्याचाच सीक्वल आहे. निर्मात्यांनी सांगितले की भूल भुलैया २ ने पहिल्या दिवशी १४.११ कोटी रुपये कमावले होते, त्यानंतर शनिवारी १८.३४ कोटी रुपये कमावले होते. रविवारचे उत्पन्न २३.५१ कोटी रुपये झाले.

या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार आणि मुराद खेतानी यांनी केली असून अनीस बज्मी यांनी दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात तब्बूचीही भूमिका आहे.