असं झालं 'भूल भूलैय्या ३'चं शूटिंग! 'कॅप्टन ऑफ द शिप'ने शेअर केले पडद्यामागचे BTS फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 13:36 IST2024-11-08T13:01:30+5:302024-11-08T13:36:17+5:30
'भूल भूलैय्या ३' सिनेमा सध्या चांगलाच गाजतोय. सिनेमाचे दिग्दर्शक अनीस बाझमींनी सिनेमाचे पडद्यामागील क्षण सर्वांना दाखवले आहेत

'भूल भूलैय्या ३'ची सध्या चांगलीच उत्सुकता आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरडुपरहिट झालाय. सिनेमाचे दिग्दर्शक अनीस बाझमींनी सिनेमाचे BTS फोटो शेअर केलेत
'भूल भूलैय्या ३'मध्ये असलेल्या माधुरी दीक्षित-विद्या बालन यांच्यासोबत दिग्दर्शक चर्चा करुन त्यांना सीन समजावताना दिसत आहेत
कार्तिक आर्यन आणि तृप्ती डिमरीची मजा-मस्ती सुरु असलेली पाहायला मिळतेय. अनीस बाझमी त्यांच्याशी चर्चा करताना दिसत आहेत
'भूल भूलैय्या ३'चे कॅप्टन ऑफ द शिप अर्थात अनीस बाझमींनी पुन्हा एकदा त्यांच्या उत्कृष्ट दिग्दर्शनाने सिनेमा सुपरहिट केलाय
माधुरी दीक्षित आणि विद्या बालन यांनी अनुक्रमे अंजुलिका आणि मंजुलिकाचं कॅरेक्टर साकारलं आहे
'भूल भूलैय्या ३'चा आयकॉनिक सिंहासन उचलायचा सीन कसा शूट झाला याची झलक तुम्हाला या फोटोमध्ये बघता येईल
प्रमुख कलाकारांसोबत सिनेमात असलेल्या अश्विनी काळसेकर आणि संजय मिश्रा या दोघांनीही त्यांच्या विनोदी टायमिंगमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय