बिपाशा बासूचा बिकीनी लूकचा सोशल मीडियावर धुमाकूळ, पाहून चाहत्यांच्या नजरा हटेना By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 11:45 AM 2021-03-08T11:45:50+5:30 2021-03-08T11:50:37+5:30
बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरीही आजही तिची जादू कमी झालेली नाहीय. आजही चाहत्यांची पूर्वी इतकीच ती फेव्हरेट आहे. सोशल मीडियावरही बिपाशू खूपच सक्रिय असते आणि बर्याचदा तिचे फोटो व्हिडिओही शेअर करते. मालदिव्हजचा हा सुंदर समुद्रकिनारा आणि बीचवर बिपाशाच्या घायाळ करणा-या अदा पाहून चाहते झालेत फुल टु फिदा.
रुपेरी पडद्यावर अभिनय आणि सौंदर्याने बिपाशाने नेमहीच सा-यांना भुरळ पाडलीय .
सध्या बिकीनी लूकमधूनही रसिकांना बिपाशा घायाळ करतेय.
बिपाशाचा फिटनेस पाहता ती ४२ वर्षांची आहे यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही.
सोशल मीडियावरही ती बरीच एक्टिव्ह असून तिचे अनेक फॉलोअर्स आहेत.
बिपाशा बासूचे बिकीनी फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, यात तिचा बोल्ड लूक पाहायला मिळत आहे.
बिपाशा बासू सध्या व्हॅकेशन एन्जॉय करतेय. याच दरम्यान तिने हे फोटो शेअर कले आहेत.
पिंक कलरच्या बिकीनीत बिपाशाचा घायाळ करणारा अंदाज पाहून चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव केला आहे.
बिपाशानेही तिचा फोटो शेअर करत समर्पक अशी कॅप्शन दिली आहे.
स्वतःवर प्रेम करा असे म्हणत तिने हा फोटो शेअर केला आहे.