मराठमोळ्या अभिनेत्रीला कुटुंबीयांनी नाकारलं तर पळून जाऊन केलं लग्न, फिल्मी आहे राम कपूरची Love Story!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2024 02:29 PM2024-09-01T14:29:57+5:302024-09-01T15:02:42+5:30

राम कपूरच्या रील लाइफविषयी सगळ्यांनाच ठाऊक आहे. मात्र त्यांच्या खासगी आयुष्याविषयी फारसे कुणाला काही ठाऊक नाही.

टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेता राम कपूरला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. कलाविश्वात राम कपूरला एक मानाचं स्थान आहे. अनेक सिनेमा आणि मलिकांमध्ये दमदार भूमिका साकारत त्यानं चाहत्यांचं मनोरंजन केलं.

आज राम कपूरचा वाढदिवस आहे. तो 51 वर्षांचा झाला आहे. त्याच्या या खास दिवशी चाहते आणि सेलिब्रिटी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

राम याच्या रील लाइफविषयी सगळ्यांनाच ठाऊक आहे. मात्र त्यांच्या खासगी आयुष्याविषयी फारसे कुणाला काही ठाऊक नाही.

तुम्हाला माहितेय का राम कपूरने घरच्यांच्या विरोधात जाऊन एका मराठी अभिनेत्रीशी पळून जाऊन लग्न केलं आहे.

राम कपूरची लव्हस्टोरी फार फिल्मी आहे. गौतमी गाडगीळ या मराठी अभिनेत्रीशी राम कपूरने लग्न केलं आहे. दोघांच्या लव्ह स्टोरीची सुरुवात 'घर एक मंदिर' या मालिकेच्या सेटवर झाली होती.

या मालिकेत राम कपूर आणि गौतमी हे दीर आणि वहिनीच्या भूमिकेत होते. गौतमीने रामच्या वहिनीची भूमिका वठवली होती. पण, एकाच मालिकेत काम करता करता दोघांमध्ये मैत्री झाली अन् मैत्रीचं रुपातंर प्रेमात झाले.

रामच्या प्रेमात पडायच्या आधी गौतमीचं नाव एका लोकप्रिय फोटोग्राफर्ससोबत जोडलं गेलं होतं. दोघांनी लग्नही केलं होतं. पण लग्नाच्या काही महिन्यांतच त्यांच्यात वाद होऊ लागले. त्यामुळं त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.

राम हा पंजाबी कुटुंबातील असून गौतमी ही मराठी कुटुंबातील आहे. या दोघांनी जेव्हा त्यांच्या नात्यावर घरात सांगितलं, तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांकडून लग्नाला परवानगी नव्हती.

तरीही राम आणि गौतमी हे एकमेकांशीच लग्न करण्यावर ठाम होते. अखेर 14 फेब्रुवारी 2003 रोजी दोघांनी घरातून पळून जाऊन मंदिरात लग्न केलं. या दोघांना सिया ही मुलगी आणि अक्स हा मुलगा आहे.

राम कपूरने आपल्या कामांमधून हिरो हा फक्त सिक्स पॅक्स वालाच असू शकतो, हा समज दूर केला. त्याचं जास्त असलेलं वजन कधीच त्याच्या कामाच्या आड आलं नाही. आपल्या अभिनयाच्या जोरावर मालिका आणि सिनेमांमधून त्यानं हिरो म्हणून वेगळी ओळख निर्माण केली.