Birthday Special: The reason behind the name 'Tiger' is its habit
Birthday Special : 'टायगर' बद्द्लच्या या गोष्टी ऐकून व्हाल अवाक्! By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2020 01:14 PM2020-03-02T13:14:57+5:302020-03-02T16:41:55+5:30Join usJoin usNext टायगर श्रॉफ ‘हिरोपंती’ या चित्रपटातून डेब्यू करणारा टायगर श्रॉफ आता बॉलिवूडचा अॅक्शन हिरो म्हणून ओळखला जातो. लाखों तरूणी टायगरवर फिदा आहेत आज टायगरचा वाढदिवस. 2 मार्च 1990 रोजी जन्मलेल्या टायगरचे खरे नाव जय हेमंत श्रॉफ असे आहे आज टायगरबद्दलच्या काही इंटरेस्टिंग गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. डॅड जॅकी श्रॉफ यांच्या पावलावर पाऊल टाकत टायगर बॉलिवूडमध्ये आला पण खरे तर टायगरचा जन्म झाला, त्याचक्षणी तो हिरो बनणार, हे निश्चित झाले होते अगदी पाळण्यात असतानाच त्याला साईनिंग अमाऊंटही मिळाले होते होय, जॅकी श्रॉफ यांच्या घरी मुलगा झाला हे कळताच दिग्दर्शक सुभाष घई जॅकी यांच्या घरी गेले टायगर पाळण्यात होता. त्याला पाहून सुभाष घईनी खिशातून 101 रूपये काढले आणि ते जॅकीच्या हातावर ठेवले. हे 101 रूपये म्हणजे टायगरचे साईनिंग अमाऊंट होते. हा मोठा झाला की, मी त्याला हिरो म्हणून लॉन्च करणार, असे 101 रूपये देत सुभाष घई जॅकीला सांगितले होते अर्थात टायगर मोठा झाल्यावर असे काहीही झाले नाही. होय, कारण टायगरला सुभाष घई यांनी नाही तर साजिद नाडियाडवाला यांनी ‘हिरोपंती’मधून लॉन्च केले. टायगरचे खरे नाव जय हेमंत श्रॉफ असे आहे. टायगरचे वडिल जॅकी यांचा लहान भाऊ जय हेमंत याच्या नावावरून त्याचे नाव ठेवण्यात आले होते जॅकी श्रॉफ यांनी खूप लहान वयात या भावाला गमावले होते. टायगरचे टायगर हे नाव पडण्यामागे त्याची लहानपणीची एक सवय कारणीभूत आहे लहानपणी टायगरला चावायची सवय होती. तो सगळ्यांना चावत सुटायचा. तो सतत चावायचा. या सवयीसाठी त्याच्या आईने त्याला अनेकदा बदडले होते. तो जसा जसा मोठा झाला, तशी तशी त्याची ही सवय वाढली. घरी येणा-या पाहुण्यांनाही तो चावायचा त्यामुळे जॅकी यांनी त्याचे टायगर हे नाव ठेवले होते.टॅग्स :बॉलिवूडटायगर श्रॉफbollywoodtiger Shroff