Birthday Special: अभिनेत्री आहे उच्चशिक्षित क्रिमिनल सायकॉलॉजिस्ट बनत या गोष्टींचा घेतला शोध By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 10:32 AM 2021-03-13T10:32:20+5:30 2021-03-13T10:40:30+5:30
Birthday special geeta basra life unknown facts: बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री उच्चशिक्षित आहेत कोणी डॉक्टर इंजिनिअर अशा पदव्या घेतल्यानंतरही अभिनयाकडे वळत इंडस्ट्रीत आपले एक वेगळे स्थना निर्माण केले आहे. अशा अभिनेत्रींपैकी एक आहे गीता बसरा. गीता बसरा 37 वा वाढदिवस साजरा करत असून देशभरातील तिच्याचाहते तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहे.
एखादा व्यक्ति गुन्हा करण्याआधी त्याच्या मनात काय सुरु असेत ? त्याची मानसिकता काय असते ? गुन्हेगारी कशी आणि का वाढते ? या सगळ्या गोष्टीची उत्तर गीताला शोधायची होती.
म्हणून लॉचे शिक्षण घेवून गीता बसरा क्रिमिनल सायकॉलॉजिस्टही बनली.
कॉलेजमध्ये असतानाच तिने अभिनयाला सुरुवात केली होती.
गीता बसराचा कॉलेजपासून सुरु झालेला प्रवास शेवटी बॉलिवूडपर्यत पोहचला.
2006 साली 'दिल दिया है' या चित्रपटातून गीतानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
त्यानंतर 'द ट्रेन', 'जिल्हा गाझियाबाद', 'सेकंड हँड हसबंड', 'लॉक' यांसारख्या चित्रपटांमध्ये ती झळकली.
'ट्रेन' या चित्रपटामुळं ती खऱ्या अर्थानं प्रकाशझोतात आली होती.
या सिनेमात गीताचा बोल्ड अंदाज प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर बघायला मिळाला होता.
या सिनेमात गीताने इमरान हाश्मीसोबत इंटीमेट होत बोल्ड सीन्स दिले होते.
तिचे हे बोल्ड सीन्स पाहून सगळेच आश्चर्यचकीत झाले होते.
विशेष म्हणजे चित्रपटात इमरान हाशमीसोबत केलेल्या किसिंग सीनमुळं तिची तुफान चर्चा झाली होती.
भारतीय टीमचा क्रिकेटपटू हरभजन सिंगची गीता बसरा पत्नी आहे.
29 ऑक्टोबर 2015 रोजी गीता भज्जीसोबत लग्नाच्या बेडीत अडकली होती.