मालदीवमध्ये परिणीती-राघवने सेलिब्रेट केला लग्नाचा पहिला वाढदिवस; रोमॅंन्टिक फोटो पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2024 03:00 PM2024-10-01T15:00:59+5:302024-10-01T15:09:14+5:30

अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चढ्ढा सर्वाधिक चर्चेत असणारे सेलिब्रिटी कपल आहे.

गतवर्षी २४ सप्टेंबर या दिवशी परिणीती आणि राघव चढ्ढा विवाह बंधनात अडकले.

सध्या हे जोडपं आपल्या लग्नाच्या पहिला वाढदिवस मालदीवमध्ये सेलिब्रेट करत आहे.

अभिनेत्री परिणीती चोप्राने त्यांचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

मालदीवच्या बीचवरील सनकिस्ड फोटो तसेच आपल्या पतीसोबत मिरर सेल्फी घेत खास फोटो अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केले आहेत.

या फोटोंमध्ये परिणीती आणि राघव एकमेकांसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करताना दिसत आहे. दोघेही आपला व्हेकेशन पूर्णपणे एन्जॉय करत आहेत.

शिवाय परिणीतीने सायकल चालवतानाचे तसेच पासपोर्टचेही फोटोज क्लिक केले आहेत.

परिणीती-राघव चढ्ढा यांच्या रोमॅंन्टिक फोटोंवर नेटकऱ्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे.