ना जया, ना रेखा! 'या' मुलीच्या प्रेमात होते अमिताभ बच्चन, तिच्यासाठी घरही सोडलं पण..

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 12:31 IST2025-04-07T11:57:16+5:302025-04-07T12:31:54+5:30

अमिताभ यांच्या सुरुवातीच्या काळात त्यांच्या आयुष्यात एक मुलगी होती. दोघंही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते पण... (amitabh bachchan)

अमिताभ बच्चन हे बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेते. अमिताभ यांना आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय. अमिताभ यांचं रिअल लाईफमध्ये जया बच्चन यांच्याशी लग्न झालंय.

जया बच्चन यांच्याशी बिग बींनी लग्न केलं असलं तरीही अमिताभ आणि रेखा यांच्या अफेअरच्या चर्चाही एके काळी गाजल्या. पण जया आणि रेखाआधी अमिताभ यांच्या आयुष्यात एक मुलगी होती. ती त्यांचं पहिलं प्रेम होती.

मेरी सहेली पॉडकास्टमध्ये लेखक हनीफ जवेरी यांनी याविषयी खुलासा केला. अमिताभ कोलकातामध्ये असताना एका कंपनीत काम करायचे. त्याकाळात ब्रिटीश एअरवेजमध्ये फ्लाईट अटेंडेंटचं काम करणारी एक मुलगी बिग बींच्या आयुष्यात आली. तिचं नाव माया.

त्यावेळी अमिताभ आणि माया एकमेकांच्या प्रेमात होते. त्याचदरम्यान अमिताभ अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी मुंबईत आले. त्यावेळी आई तेजी बच्चन यांच्या एका नातेवाईकाच्या घरी बिग बी राहायचे. माया त्याच ठिकाणी अमिताभ यांना भेटायची.

'माझं आणि मायाच्या नातं आईला कळलं तर अडचण निर्माण होईल', म्हणून अमिताभ यांनी मुंबईतील ते घर सोडलं. पुढे अमिताभ यांना 'सात हिंदुस्तानी' हा पहिला सिनेमा मिळाला. या सिनेमातील सहकलाकार अन्वर अलींना बिग बींनी मायाविषयी सांगितलं.

अमिताभ काहीसे लाजाळू तर माया बोल्ड अन् बिनधास्त स्वभावाची होती. 'माया तुझ्या कुटुंबात फिट बसणार नाही', असा सल्ला अन्वर अलींनी बिग बींना दिला. त्यानंतर अमिताभ आणि मायामध्ये दुरावा निर्माण झाला.

अखेर काही दिवसानंतर अमिताभ आणि मायाचं ब्रेकअप झालं. अशाप्रकारे अमिताभ यांच्या पहिल्या प्रेमाची अखेर झाली.