bollywood actress 12th fail fame medha shankar latest photo viral on socila media
काली जुल्फे, नशीली आंखें..., नॅशनल क्रश मेधाची सोशल मीडियावर हवा By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 04:50 PM2024-03-12T16:50:59+5:302024-03-12T16:58:53+5:30Join usJoin usNext अभिनेत्री मेधा शंकर हे नाव अगदी अल्पावधीतच लोकप्रिय झालं. मेधा शंकर '12th Fail' सिनेमातून नॅशनल क्रश ठरली. या सिनेमाने तिला रातोरात स्टार केलं. अभिनेत्रीचे या चित्रपटामुळे खूप कौतुक झाले. विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित '12th Fail', ऑक्टोबरमध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. झिरो मधून हिरो बनण्याची कहाणी चित्रपटात खूप छान दाखवण्यात आली आहे. त्यात मेधा शंकर झळकली. मेधा शंकरने २०२१ मध्ये शादीस्थान या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला. हा तिचा पहिला सिनेमा होता. त्यानंतर तिच्या फॉलोअर्समध्ये प्रचंड वाढ झाली. इंडस्ट्रीत अनेक वर्षे स्ट्रगल केल्यानंतर मेधाला तिच्या यशाचा मार्ग सापडला. मेधा शंकरचा जन्म नोएडा येथे झाला. मेधा फक्त अभिनेत्री नसून, एक उत्कृष्ट गायक आणि मॉडेल देखील आहे. तिने दिल्ली विद्यापीठातून बॅचलर ऑफ कॉमर्स ही पदवी मिळवली तर, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, दिल्ली येथून फॅशन मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर पदवी संपादित केली. अभिनेत्रीने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंग आणि टीव्ही जाहिरातींमधून केली. २०१५ साली प्रदर्शित झालेला 'विथ यू फॉर यू ऑल्वेज' या शॉर्ट फिल्मद्वारे तिने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. साधारणत: २०१९ साली मेधाने ब्रिटिश टेलिव्हिजन मालिका बीचम हाऊसमध्ये रोशनाराची भूमिका साकारली होती. त्यानंतर खऱ्या अर्थाने तिचा अभिनय क्षेत्रातील प्रवास सुरू झाला. शिवाय डिज्नी प्लस हॉटस्टारवरील ‘दिल बेकरार’ ही वेब सिरीज देखील तिची उत्तम गाजली. पण तिला खरी ओळख 12th Fail या चित्रपटातून मिळाली. अलिकडेच मेधा शंकरचे काही फोटो सोशल मीडियावर कमालीचे व्हायरल होत आहेत. लाल रंगाच्या ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये मेधा कमाल दिसतेय. मेधाने तिच्या सौंदर्याने नेटकऱ्यांना घायाळ केल्याचं पाहायला मिळतंय. मोकळे केस, डायमंड ज्वेलरी आणि नाजूकसे कानातले असा परिपूर्ण लूक तिने केलाय. टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटीbollywoodCelebrity