IN PICS : किती शिकलीये आलिया भट? किती आहे प्रॉपर्टी?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 11:30 AM2022-02-28T11:30:21+5:302022-02-28T11:39:20+5:30

Alia Bhatt : बॉलिवूडची चुलबुली गर्ल आलिया भट इंडस्ट्रीच्या टॉप हिरोईनपैकी एक आहे. नुकताच आलियाचा ‘गंगुबाई काठियावाडी’ हा सिनेमा रिलीज झाला. साहजिकच सगळीकडे आलियाच्या नावाची चर्चा आहे.

बॉलिवूडची चुलबुली गर्ल आलिया भट इंडस्ट्रीच्या टॉप हिरोईनपैकी एक आहे. नुकताच आलियाचा ‘गंगुबाई काठियावाडी’ हा सिनेमा रिलीज झाला. साहजिकच सगळीकडे आलियाच्या नावाची चर्चा आहे.

लहान वयात आलियाने मोठ्ठ यश मिळवलं. अवघ्या काही वर्षांत ती टॉपची हिरोईन बनली. अभिनेत्री व्हायचं हे आलियाने पक्क ठरवलं होतं. त्यासाठी तिनं शिक्षणही अर्धवट सोडलं. आलिया किती शिकलीये माहितीये?

तर अनेक दिग्गज हिरोईनला मागे सारणारी आलिया फक्त 12 वी पास आहे. जमनाबाई नरसी स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केलं आहे.

शिक्षण सुरू असतानाच सिनेमात ब्रेक मिळाला आणि यामुळे आलियाच्या शिक्षणालाही ब्रेक लागला. शिक्षण अर्धवट सोडून आलिया सिनेमात आली.

आलियाने आयुष्यात कधी कॉलेजची पायरी चढली नाही. मात्र योगायोग असा की, पहिल्याच डेब्यू सिनेमात तिला कॉलेज जीवनावर आधारित सिनेमा मिळाला.

करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इअर’ या सिनेमातून आलियाचा डेब्यू झाला. यानंतर तिनं कधीच मागे वळून पाहिलं नाही.

28 वर्षांची आलिया आज कोट्यावधीच्या संपत्तीची मालिकीन आहे. तिची नेटवर्थ 165 कोटी रूपये आहे.

वांद्रे भागात तिचं स्वत:चं 32 कोटींचं घर आहे. लंडनमध्येही घर आहं. काहीच महिन्यांआधी जुहूत तिने नवं घर खरेदी केलं.

2015 साली आलियाने अनुपम खेर यांच्याकडून दोन फ्लॅट खरेदी केले होते.यापैकी एका फ्लॅटची किंमत 5.16 कोटी तर दुसऱ्या फ्लॅटची किंमत 3.83 कोटी होती.

गेल्यावर्षी आलियाने तिचं स्वत:चं प्रॉडक्शन हाऊसही सुरू केलं. दरवर्षी केवळ जाहिरातीतून आलिया 3.6 कोटी रूपये कमावते.