मलेशियामध्ये भाग्यश्रीच्या ग्लॅमरस लूकची हवा; वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरही आहे फिट & फाइन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 03:58 PM2024-06-27T15:58:51+5:302024-06-27T16:10:56+5:30

Bhagyashree: भाग्यश्रीने तिच्या वयाची पन्नाशी ओलांडली आहे. मात्र, तिचा फिटनेस आजही २० वर्षांच्या तरुणीला लाजवेल असाच आहे.

सूरज बडजात्या यांच्या 'मैंने प्यार किया' या सिनेमाच्या माध्यमातून इंडस्ट्रीत पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे भाग्यश्री (Bhagyashree).

सौंदर्य, स्वभावातील साधेपणा आणि उत्तम अभिनय यांच्या जोरावर भाग्यश्रीने ९०चा काळ गाजवला.

विशेष म्हणजे मैंने प्यार कियाच्या माध्यमातून ती रातोरात सुपरस्टार झाली. भाग्यश्रीची क्रेझ आजही कमी झाली नसून ती सोशल मीडियाच्या माध्यमातून कायम चाहत्यांच्या संपर्कात येत असते.

भाग्यश्रीने तिच्या वयाची पन्नाशी ओलांडली आहे. मात्र, तिचा फिटनेस आजही २० वर्षांच्या तरुणीला लाजवेल असाच आहे.

भाग्यश्री अलिकडेच व्हेकेशन एन्जॉय करण्यासाठी मलेशियाला गेली होती. येथील फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

सध्या सोशल मीडियावर भाग्यश्रीचे काही ग्लॅमरस फोटो व्हायरल होत आहेत.

भाग्यश्रीने अलिकडेच एक फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे.

बऱ्याचदा ती तिचा डाएट प्लान, वेगवेगळ्या हेल्दी रेसिपी आणि तिच्या वर्कआऊटचे व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करते.