ब्लॅक आऊटफिटमध्ये भूमी पेडणेकरचा स्टनिंग लूक; फोटो शेअर करत म्हणते- "रानी इज..."

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 03:47 PM2024-12-03T15:47:02+5:302024-12-03T15:58:53+5:30

अभिनेत्री भूमी पेडणेकरच्या लेटेस्ट फोटोशूटची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरने तिच्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.

'दम लगा के हैशा','थॅंक्यू फॉर कमिंग' तसेत 'द लेडी' किलर यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे.

अलिकडेच भूमी 'भक्षक' या चित्रपटात पाहायला मिळाली होती.

सोशल मीडियावरही भूमी पेडणेकर सक्रिय असते.

वेगवेगळे फोटो, व्हिडीओ तसेच तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल ती याद्वारे चाहत्यांना अपडेट्स देत असते.

नुकतेच तिने काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये हटके पोज देत फोटोशूट केलं आहे.

हे फोटो तिने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्रीचा घायाळ करणारा अंदाज पाहायला मिळतोय.

"रानी इज डिनर रेडी", असं कॅप्शन भूमीने या फोटोंना दिलं आहे.