PHOTO: रूप सुहाना लगता है! अभिनेत्री डेझी शाहचं सुंदर फोटोशूट, नेटकरी घायाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 16:39 IST2024-10-22T16:33:40+5:302024-10-22T16:39:57+5:30
बॉलिवूड अभिनेत्री डेझी शाह तिच्या प्रोजेक्ट्सबरोबर वैयक्तिक गोष्टींमुळेही चर्चेत येत असते.

डेझीने २०११ मध्येच कन्नडमधील ‘बॉडीगार्ड’ या चित्रपटातून अभिनयाला सुरुवात केली होती.
शिवाय तिने 'जय हो' सिनेमातून बॉलिवूड इंडस्ट्रीत पदार्पण केलं.
तब्बल दोन वर्षे गणेश आचार्यच्या ग्रुपमध्ये अभिनेत्रीने डान्सर म्हणून काम केलं. पुढे त्यांची डान्स असिस्टंट म्हणूनही तिने काम पाहिलं.
नुकतेच अभिनेत्रीने सोशल मीडियावर पिवळ्या रंगाची घागरा चोळी परिधान करून काही फोटो पोस्ट केले आहेत.
या सुंदर आऊटफिटमध्ये डेझी खूपच गोड दिसते आहे.
तिचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
'हेट स्टोरी ३', 'बॉडीगार्ड', 'रेस ३' आणि 'रामरत्न' यांसारख्या सिनेमात तिने काम केलं आहे.