फोटोतील या अभिनेत्रीला ओळखलंत का? सलमानसोबत केलंय काम; सध्या आहे लाइमलाइटपासून दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 04:11 PM2024-09-28T16:11:22+5:302024-09-28T16:15:49+5:30

अभिनेत्री डेझी शाहने सलमान खानच्या 'जय हो' सिनेमातून बॉलिवूड इंडस्ट्रीत पदार्पण केलं.

सलमान खानने बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्रींना लॉंच केलं आहे. त्यातील काही जणी एकाच चित्रपटानंतर गायब झाल्या तर काहींच करिअर यशस्वी झालं.

त्यातील एक अभिनेत्री म्हणजे डेझी शाह. सलमानच्या 'जय हो' सिनेमातून तिने अभिनयात पदार्पण केलं. डेझी आधी बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम करत होती.

डेझी शाह कायमच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत येत असते.

सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

नुकतेच अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिचे ग्लॅमरस अंदाजातील काही फोटो पोस्ट केले आहेत.

डेझीच्या या व्हायरल फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

डेझीने २०११ मध्येच कन्नडमधील ‘बॉडीगार्ड’ या चित्रपटातून अभिनयाला सुरुवात केली होती.