PHOTO: "हँसता हुआ नूरानी चेहरा, काली जुल्फें रंग सुनहरा..." जान्हवी कपूरचं मनमोहक रूप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 17:03 IST2024-11-21T16:53:19+5:302024-11-21T17:03:59+5:30

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने दमदार अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर आपला भलामोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे.

आपल्या आईच्या पावलावर पाऊल ठेवत जान्हवीने बॉलिवूडमध्ये आपली पकड मजबूत केली आहे.

२०१८ साली आलेल्या 'धडक' या चित्रपटाच्या माध्यमातून तिने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं.

जान्हवी तिच्या अभिनयासह फॅशनसेन्समुळे कायमच चर्चेत येत असते.

अलिकडेच ती 'देवरा पार्ट -१' या चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आली होती.

दरम्यान, नुकतेच अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिचे काही खास फोटो पोस्ट केले आहेत.

या फोटोंमधील जान्हवीचा लूक नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे.

जान्हवीच्या या फोटोंची इन्स्टाग्रामवर चर्चा होताना दिसते.

"On set glow..." असं कॅप्शन जान्हवीने या फोटोंना दिलं आहे.