वयाच्या पन्नाशीतही तरुणींना लाजवणारं करिश्मा कपूरचं सौंदर्य; 'लोलो'च्या फोटोंवरून नजर हटेना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 04:36 PM2024-10-14T16:36:10+5:302024-10-14T16:50:23+5:30

९० च्या दशकात अभिनेत्री करिश्मा कपूरने तिच्या अभिनयासह सौंदर्याने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं होतं.

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते.

स्टाईल स्टेटमेंटसाठी ओळखली जाणारी करिश्मा आतासुद्धा तिच्या अनोख्या अंदाजानं सर्वांचं लक्ष वेधून घेते.

करिश्मा बॉलिवूडमध्ये कमी सक्रिय असली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.

त्याशिवाय अभिनेत्री तिच्या फिटनेसवरही कायम लक्ष देते.

सध्या तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे करिश्मा लाइमलाइटमध्ये आली आहे.

गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने झक्कास फोटोशूट केलं आहे. तिचे हे फोटो नेटकऱ्यांना खूपच आवडले आहेत.