लापता लेडीजमधील 'फूल कुमारी' खऱ्या आयुष्यातही आहे तितकीच ग्लॅमरस; नितांशीचे लेटेस्ट फोटो पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 04:11 PM2024-10-02T16:11:47+5:302024-10-02T16:27:18+5:30

'लापता लेडीज' या चित्रपटात 'फूल कूमारी' ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री नितांशी गोयल सध्या चर्चेत आहे. नुकतंच नितांशीने एक फोटोशूट केलं आहे.

किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज' या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. २०२५ च्या ऑस्कर पुरस्कारासाठी या चित्रपटाची भारत सरकारतर्फे निवड झाली आहे.

'लापता लेडीज'मध्ये अभिनेत्री नितांशी गोयलने आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं.

अभिनेत्री तिच्या सौंदर्याबरोबरच स्टाइलिश लूकने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेते. नितांशीच्या फॅशन्स सेन्सची कायमच चर्चा होताना दिसते.

चित्रपटांत दिसणारी साधी-भोळी 'फूल कुमारी' तिच्या खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे.

नुकतंच तिने केलेलं लेटेस्ट फोटोशूट नेटकऱ्यांना प्रचंड आवडल्याचं दिसतंय.

फिकट गुलाबी रंगाचा शर्ट अन् डेनिम जिन्समध्ये तिने सुंदर असं फोटोशूट केलं आहे. अभिनेत्रीच्या सौंदर्याकडे पाहून नेटकऱ्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

"Nothing here just two gorgeous people looking at each other " असं कॅप्शन देत नितांशीने तिचे हे फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत.