PHOTO: पुनम ढिल्लो यांच्या लेकीला पाहिलंत का? सौंदर्यापुढे बॉलिवूड अभिनेत्रीही पडतील फिक्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 17:07 IST2025-04-21T16:59:10+5:302025-04-21T17:07:17+5:30

पुनम ढिल्लो यांच्या लेकीला पाहिलंत का? फोटो पाहा

आपल्या अभिनय आणि सौंदर्याने एक काळ गाजवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री पुनम ढिल्लो यांनी अनेक महत्त्वाच्या आणि यशस्वी चित्रपटात काम केलंय. बॉलिवूड इंडस्ट्रीचा एक काळ त्यांनी गाजवला.

पुनम ढिल्लो सध्या अभिनय क्षेत्रात वावर कमी झाला आहे. प्रसिद्धीच्या शिखरावर असताना पुनम ढिल्लोन यांनी निर्माते अशोक ठकेरीयासोबत लग्न झाले होते. पण लग्नाच्या काहीच वर्षांत त्यांनी घटस्फोट घेतला. त्यांना पलोमा आणि अनमोल अशी दोन मुले आहेत.

सध्या सोशल मीडियावर पुनम यांची लेक पलोमा ठकेरिया ही चर्चेत आहे.

आईच्या पावलांवर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे. 'दोनों' या चित्रपटातून तिने इंडस्ट्रीत पदार्पण केलं.

पुनम यांची लेक सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. त्याद्वारे ती बऱ्याचदा तिच्या जीवनातील काही महत्त्वाचे क्षण, प्रसंग चाहत्यांसोबत शेअर करत असते.

पलोमाने मुंबईच्या जमनाबाई नर्सी कॉलेजमधून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. या शिवात ती आपल्या फिटनेसकडे विशेष लक्ष देताना दिसते. तिने मार्शल आर्ट्सचंही शिक्षण घेतलं आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर पलोमाची तगडी फॅन फॉलोइंग आहे. तिच्या निखळ सौंदर्यापुढे अनेक बॉलिवूड देखील फिक्या पडतील.