प्रियांका- परिणीतीपेक्षाही कैकपटीने हॉट आहे त्यांची धाकटी बहीण; साऊथ सिनेमांमध्ये करते काम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 07:51 PM2023-03-02T19:51:24+5:302023-03-02T20:01:20+5:30

Meera chopra: मीरा सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असून बऱ्याचदा तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांकां चोप्रा आणि परिणीती चोप्रा यांच्याविषयी साऱ्यांनाच ठावूक आहे.

अनेकदा परिणीती आणि प्रियांका एकमेकींसोबतचे फोटो शेअर करत असतात. मात्र, यावेळी आपण त्यांच्या आणखी एका बहिणीविषयी जाणून घेणार आहोत.

प्रियांका आणि परिणीतीला आणखी एक लहान बहीण असून मीरा चोप्रा असं तिचं नाव आहे.

प्रियांकाप्रमाणेच मीरादेखील अभिनेत्री असून ती दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत नशीब आजमावत आहे.

मीराने अनेक तेलुगू, तामिळ चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

मीरा सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असून बऱ्याचदा तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

मीराने काही बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं आहे.

गँग ऑफ घोस्ट, Section 375, नास्तिक या बॉलिवूडपटांमध्ये ती झळकली आहे.

मीराने प्रियांकाच्या लग्नातील फोटोही शेअर केले आहेत.