९० च्या दशकातील 'या' ग्लॅमरस अभिनेत्रीला ओळखलं का? सौंदर्याची आजही होते चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 16:50 IST2024-11-08T16:39:46+5:302024-11-08T16:50:47+5:30

९० च्या दशकात 'ग्लॅमरस गर्ल' नावाने ओळखली जाणारी अभिनेत्री सोनम आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिचे काही लेटेस्ट फोटो पोस्ट केले आहेत. सोनमचे हे फोटो चर्चेचा विषय ठरले आहेत.

डोळ्यांना गॉगल, ऑफ शोल्डर ड्रेस परिधान करून अभिनेत्रीने नेटकऱ्यांना घायाळ केलं आहे.

सोनम खान ही बॉलिवूडमधील नावाजलेल्या अभिनेत्रींपैकी एक आहे. वयाच्या १४ व्या वर्षी सोनमने अभिनय क्षेत्रात पदार्पण करून इंडस्ट्री गाजवली होती.

'ओए ओए', 'तिरछी टोपी वाले' यांसारख्या गाण्यांमुळे तिची क्रेझ आजही चाहत्यांमध्ये पाहायला मिळते.

१९८८ मध्ये आलेल्या तिच्या पहिल्याच 'विजय' सिनेमात अनेक बोल्ड आणि किसिंग सीन दिले होते.

त्यानंतर सोनमला एका पेक्षा एक चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या. त्यावेळेस सोनम खानने माधुरीसह असंख्य बॉलिवूड नायिकांच्या अभिनयात टक्कर दिली होती.

पण, 'त्रिदेव' हा चित्रपट अभिनेत्रीच्या करिअरला कलाटणी देणारा ठरला.

सध्या सोशल मीडियावर तिच्या या व्हायरल होणाऱ्या फोटोंनी धुमाकूळ घातला आहे.