महागड्या कार आणि आलिशान घरासह कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण आहे 'ही' लोकप्रिय अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 02:10 PM2024-09-11T14:10:36+5:302024-09-11T14:27:08+5:30

अभिनेत्री असण्यासोबतच ती एक उत्कृष्ट डान्सर देखील आहे.

अभिनेत्री श्रिया सरन अजय देवगणसोबत 'दृश्यम' आणि 'दृश्यम 2' सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये दिसली आहे. श्रिया केवळ तिच्या अभिनयासाठीच नाही तर तिच्या सौंदर्यामुळेही चर्चेत असते.

अभिनेत्रीचा आज वाढदिवस आहे. फार कमी लोकांना माहीत असेल की, अभिनेत्री असण्यासोबतच श्रिया एक उत्कृष्ट डान्सर देखील आहे आणि या छंदामुळेच ती चित्रपटसृष्टीत आली आहे.

लहानपणापासूनच तिला नृत्याची आवड होती. तिच्या छंदामुळे ती क्लासिकल आणि वेस्टर्न डान्स शिकली आहे. श्रियाने २००१ मध्ये प्रदर्शित झालेला तेलगू चित्रपट 'इश्तम'मधून आपल्या करिअरची सुरुवात केली.

अवघ्या दोन वर्षांनंतर या अभिनेत्रीने 'तुझे मेरी कसम'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आपल्या कारकिर्दीत श्रियाने बॉलिवूड आणि साऊथमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत.

अभिनेत्रीला खरी प्रसिद्धी अजय देवगणसोबतच्या 'दृश्यम' चित्रपटातून मिळाली. याद्वारे ती रातोरात स्टार बनली आणि तिने लोकांच्या मनावर अशी काही छाप पाडली की आज कोट्यवधी लोक तिचे फॅन आहेत.

श्रियाच्या इन्कम सोर्सबाबत मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटांव्यतिरिक्त, अभिनेत्री ब्रँड शूटमधून देखील भरपूर कमाई करते. चित्रपटासाठी अभिनेत्री जवळपास ३ ते ४ कोटी रुपये मानधन घेते.

मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर आज श्रिया सरन ७५ कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्तीची मालकीण आहे. मुंबईशिवाय परदेशातही तिचे एक आलिशान अपार्टमेंट आहे. यासोबतच अभिनेत्रीकडे अनेक महागड्या गाड्या आहेत.

श्रियाने २०१८ साली बॉयफ्रेड आणि रशियन टेनिसपटू आंद्रेई कोशेवशी लग्न केलं. त्या दोघांना एक मुलगी आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर एक्टिव्ह असून नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.