Bollywood Fashionista Sonam Kapoor Photoshoot In Green Silk Gown
Photos : बॉलिवूडची 'फॅशनिस्टा' सोनम कपूरचा हॉट अँड क्लासी लूक By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 03:38 PM2024-12-03T15:38:51+5:302024-12-03T15:47:16+5:30Join usJoin usNext सोनम कपूर तिच्या लेटेस्ट फोटोंमुळे चर्चेत आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सोनम तिच्या अभिनयासोबतच फॅशन सेन्स आणि स्टाईल स्टेटमेंटसाठी प्रसिद्ध आहे. सोनम कपूर सोशल मीडियावर खूप सक्रीय असते, ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तिनं नुकतंच इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती खूपच हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. यात सोनम ग्रीन कलरचा गाऊनमध्ये दिसत आहे. सोनमने केस मोकळे सोडले असून गळ्यात लॉकेट परिधान केलं आहे. सोनमच्या ग्लॉसी मेकअपनं चाहत्यांचं लक्ष वेधलं. यासोबतत तिनं डोळ्यांना सुंदर लुक दिला आहे. सोनमने वेगवेगळ्या पोझ देऊन फोटो क्लिक केले आहेत. तिचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सोनम कपूरने संजय लीला भन्साळी यांच्या ‘सावरिया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. सोनमने जवळपास २० चित्रपटांत काम केलं आहे. परंतु, यातील फक्त ५-६ चित्रपटच हिट ठरले आहेत. कपूर घराण्यात जन्मलेल्या सोनमला कलाविश्वात मात्र फारसं यश मिळवता आलं नाही. स्टार किड असूनही सोनमचं बॉलिवूड करिअर फ्लॉप ठरलं. सोनम 'भाग मिल्खा भाग', 'नीरजा', 'पॅडमॅन', 'वीरे दी वेडिंग', 'संजू', 'रांझणा' या चित्रपटांतही झळकली.टॅग्स :सोनम कपूरबॉलिवूडSonam Kapoorbollywood