एका पोस्टची की किंमत... ! आलिया ते प्रियंका-शाहरुखपर्यंत इंस्टावरून कोट्यवधी कमावतात By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 01:33 PM 2023-02-20T13:33:19+5:30 2023-02-20T19:08:55+5:30
सेलिब्रिटी सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह दिसतात, फॉलोअर्स वाढवण्यासाठी जीवाचा आटापिटा करतात आणि का नाही? यासाठी त्यांना पैसे मिळतात. होय, बॉलिवूडचे कलाकार एका स्पॉन्सर्ड पोस्टसाठी कोट्यवधी रूपये घेतात. हे आकडे वाचून तुम्हीही चक्रावून जाल. प्रियंका चोप्रा ही अमेरिकेतील प्रसिद्ध गायक निक जोनासची पत्नी झाली आहे. यासोबतच त्याच्या इंस्टाग्रामवर 81 मिलियन फॉलोअर्स झाले आहेत. पण काही रिपोर्ट्सनुसार, प्रियंका चोप्रा एका प्रायोजित पोस्टसाठी सुमारे 1.80 कोटी रुपये घेते.(फोटो-इन्स्टाग्राम)
आलिया भटबद्दल बोलायचे झाले तर ती आता कपूर कुटुंबाची सून झाली आहे. इतकेच नाही तर तिचे इंस्टाग्राम अकाउंटवर 75 मिलियन फॉलोअर्स झाले आहेत. आलिया एका पोस्टसाठी सुमारे 1 कोटी रुपये घेते. (फोटो-इन्स्टाग्राम)
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहेत़ ते एका पोस्टसाठी जवळपास 50 लाख रूपयांची रक्कम स्विकारतात. (फोटो-इन्स्टाग्राम)
दीपिका पादुकोणबद्दल बोलायचे झाले तर ती सध्या तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे 72 मिलियन फॉलोव्हर्स आहेत. दीपिका पादुकोण एका पोस्टसाठी 1.50 कोटीच्या घरात रक्कम घेते. (फोटो-इन्स्टाग्राम)
शाहरुख खानला बॉलिवूडचा बादशाह म्हटले जाते. अभिनेत्याचे इंस्टाग्रामवर 35 मिलियन फॉलोअर्स आहेत. शाहरुख खान एका पोस्टसाठी 80 ते 1 कोटी रुपये आकारतो. (फोटो-इन्स्टाग्राम)
बॉलिवूडचा कबीर सिंग म्हणजेच अभिनेता शाहिद कपूरचे इंस्टाग्रामवर 38 मिलियन फॉलोव्हर्स असून तो स्पॉन्सर्ड पोस्टसाठी 30 लाख ते 50 लाख रुपये घेतो. (फोटो-इन्स्टाग्राम)