बॉलिवूडचे असे सेलिब्रिटी जे बालपणी एकाच शाळेत शिकले आणि आजही आहेत बेस्ट फ्रेन्ड्स

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 12:48 PM2022-03-16T12:48:31+5:302022-03-16T13:06:17+5:30

Bollywood Stars Who Studied Together: बॉलिवूड सेलिब्रिटींच्या अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आजही अनेकांना माहीत नाहीत. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अशा स्टार्सबाबत जे बालपणी एकाच शाळेत शिकले. हे स्टार्स बालपणापासून आतापर्यंत बेस्ट फ्रेन्ड्स आहेत.

Bollywood Stars Who Studied Together: बॉलिवूड सिनेमे आणि बॉलिवूड स्टार्सचं आपल्या जीवनाशी फार जुनं नातं आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींच्या चटपटीत बातम्याही आपल्या नेहमीच आवडतात. आपल्या आवडत्या स्टार्सची खडानखडा माहीत आपल्याला हवी असते. त्यांचा पहिला सिनेमा, त्यांनी केलेलं पहिलं किस, त्यांचे अफेअर्स हे सगळं आवडीने वाचलं जातं. मात्र, बॉलिवूड सेलिब्रिटींच्या अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आजही अनेकांना माहीत नाहीत. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अशा स्टार्सबाबत जे बालपणी एकाच शाळेत शिकले. हे स्टार्स बालपणापासून आतापर्यंत बेस्ट फ्रेन्ड्स आहेत.

सलमान खान (Salman Khan) - आमिर खान (Aamir Khan) - सलमान खान आणि आमिर खानची जोडी 'अंदाज़ अपना अपना' सिनेमात तुम्ही पाहिली आहे. या सिनेमानंतर दोन्ही स्टार्स चांगले मित्र बनले होते. अनेकांना माहीत नसेल पण आमिर खान आणि सलमान खान मुंबईच्या पाली हिल येथील सेंट ऐनीज स्कूलमध्ये दुसऱ्या वर्गात एकत्र होते. पण त्यावेळी ते एकमेकांना फार ओळखत नव्हते.

हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि उदय चोप्रा (Uday Chopra) - हृतिक रोशन आणि उदय चोप्रा एकमेकांना चौथ्या वर्गापासून ओळखतात. दोघांनी शालेय शिक्षण मुंबईच्या माहिम येथील बॉम्बे स्कॉटिश स्कूलमधून घेतलं आहेत. त्यानंतर दोघे २००६ मध्ये 'धूम' सिनेमात एकत्र दिसले होते. त्यानंतर ते 'मुझसे दोस्ती करोगे' सिनेमात एकत्र होते. दोघे आजही बेस्ट फ्रेन्ड आहेत.

श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आणि टाइगर श्रॉफ़ (Tiger Shroff) - श्रद्धा आणि टायगर बालपणापासून चांगले मित्र आहेत. १५ वर्षांची असताना श्रद्धा कपूरने मुंबईच्या अमेरिकन स्कूल ऑफ बॉम्बे मध्ये प्रवेश घेतला होता. यावेळी टायगर श्रॉफ तिचा क्लासमेट होता. टायगरने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, त्याला शाळेत असतानापासून श्रद्धा आवडत होती. आज दोघेही बेस्ट फ्रेन्ड आहेत.

ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) आणि करण जोहर (Karan Johar) - अनेकांना माहीत नसेल की, करण जोहर आणि ट्विंकल खन्ना बालपणापासून मित्र-मैत्रीण आहे. आठव्या वर्गात द दून स्कूलच्या प्रवेश परिक्षेत फेल झाल्यानंतर करणच्या वडिलांना त्याला पंचगणी येथील द न्यू एका बोर्डिंग स्कूलमध्ये टाकलं होतं. इथे ट्विंकल खन्ना आधीपासून शिकत होती. यादरम्यान त्यांची चांगली मैत्री झाली.

सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि अर्जुन कपूर (Arjun Kapoor) - बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अर्जुन कपूर मुंबईच्या आर्य विद्या मंदिरात एकत्र शिकत होते. पण तेव्हा ते एकमेकांना ओळखत नव्हते. बॉलिवूडमध्ये आल्यानंतर त्यांची चांगली मैत्री झाली. 'तेवर' सिनेमात दोघे एकत्र दिसले होते.

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अवंतिका मलिक (Avantika Malik) - रणबीर कपूर आणि इमरान खानची पत्नी अवंतिका मलिक बालपणापासून मित्र आहेत. रणबीर आणि अवंतिका मुंबईच्या द बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये एकत्र शिकत होते. शाळेत असतानापासून रणबीरला अवंतिका आवडत होती. दोघे ५ वर्ष एकमेकांना डेट करत होते.

अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि साक्षी धोनी (Sakshi Dhoni) - बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि महेंद्र सिंह धोनीची पत्नी साक्षी धोनी बालपणापासून एकमेकींना ओखळतात. दोघींचेही वडील आर्मीत होते. अनुष्का आणि साक्षी आसामच्या सेंट मेरी स्कूलमध्ये एकत्र होत्या.

तापसी पन्नू (Tapsee Pannu) आणि अंगद सिंह रान्याल (Angad Singh Ranyal) - अभिनेत्री तापसी पन्नू आणि स्टॅंड अप कॉमेडिअन अंगद सिंह रान्याल एकाच वर्गात शिकत होते. अंगद सिंह रान्याल अॅमेझॉन प्राइम व्हिडीओच्या One Mic Stand आणि A Limited Stand-Up कॉमेडी सीरीजमध्ये दिसला आहे.

सारा अली ख़ान (Sara Ali Khan) आणि अनन्या पांडे (Ananya Pandey) - नव्या पीढीच्या कलाकारांबाबत सांगायचं तर सारा अली खान आणि अनन्या पांडे बालपणापासून मैत्रीणी आहेत. सारा आणि अनन्या मुंबईच्या 'धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल' मध्ये शिकल्या. सारा शाळेत अनन्याची सिनिअर होती.

आर्यन ख़ान (Aryan Khan) आणि नव्या नवेली नंदा (Navya Naveli Nanda) - शाहरूख खानचा मुलगा आणि अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार अशी चर्चा आहे. भारतात एकत्र शालेय शिक्षण घेतल्यावर दोघांनी २०१६ मध्ये इंग्लंडच्या सेवनोक्स स्कूलमधून शिक्षण घेतलं.