तुझ्यापुढे हिरा, चांदी सगळं...; बापाला लेकीचं कौतुक, जान्हवीच्या फोटोंवर बोनी कपूर यांची भन्नाट कमेंट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 12:17 PM2024-07-16T12:17:21+5:302024-07-16T12:23:31+5:30

जान्हवीच्या या फोटोंवर बोनी कपूर यांनी कमेंट करत लक्ष वेधून घेतलं आहे.

जान्हवी कपूर ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. जान्हवी ही सुप्रसिद्ध दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी आहे.

जान्हवीचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही सक्रिय असते. नुकतेच जान्हवीने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये जान्हवीचा ग्लॅमरस अवतार पाहायला मिळत आहे. जान्हवीने ऑफ शोल्डर डिझायनर ड्रेस घातला आहे.

खड्यांचे कानातले अशी अगदी साधी ज्वेलरी तिने घातली आहे. केस मोकळे सोडत जान्हवीने हा किलर लूक केला आहे.

तिने या फोटोला "एक दिन सोना, एक दिन हिरा" असं कॅप्शन दिलं आहे.

जान्हवीच्या या फोटोंवर बोनी कपूर यांनी कमेंट करत लक्ष वेधून घेतलं आहे. या फोटोंवर त्यांनी "बेटा, तुझ्यापुढे तर हिरा सोना चांदी सगळंच फिकं" असं कमेंटमध्ये म्हटलं आहे.

जान्हवीने नुकतीच अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या विवाहसोहळ्याला हजेरी लावली होती. अनंत-राधिकाच्या रिसेप्शनसाठी तिने हा खास लूक केला होता.

जान्हवीचा हा लूक चाहत्यांच्याही पसंतीस उतरला आहे. तिच्या या फोटोंवर चाहच्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.