बाळाच्या जन्मानंतर दहाच दिवसांत २१ किलो वजन कमी केले होते अर्जुन रामपालच्या गर्लफ्रेंडने, पाहून सारेच झाले होते थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2020 19:05 IST2020-12-28T18:58:24+5:302020-12-28T19:05:25+5:30

अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची कथित गर्लफ्रेंड गॅब्रिएला यांचे फोटो इंटरनेटवर व्हायरल होत असतात. दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असून या दोघांना एक मुलगाही आहे. गॅब्रिएलादेखील फिटनेसफ्रिक अभिनेत्री आहे.

ग्रॅब्रिएलाही फिटनेस फ्रिक अभिनेत्री आहे, नित्यनियमाने योग करत ती स्वतःला मेंटेन ठेवते.

डिलिव्हरी नंतर स्त्रीसाठी योगचे काही विशिष्ट प्रकार फायदेशीर ठरतात. त्याचाचा फायदा गॅब्रिएलाने सुद्धा घेतला.

नियमितपणे न चुकता योगचे विशिष्ट प्रकार करून आपले वजन कमी केले होते.

गरोदरपणात तब्बल 21 किलोने वाढले होते. मात्र तिने जे वजन काही खास टिप्स वापरून कमी केले होते.

डिलेव्हरीनंतर वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. अनेक अभिनेत्री महिने - महिने वर्कआऊट करतात .

पण गॅब्रिएला या सगळ्यांसाठी अपवाद ठरली होती.

वर्कआऊटनंतरचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोत ती एकदम फिट दिसली होती.

हा फोटो पाहिल्यानंतर तिने खरंच काही दिवसांपूर्वी बाळाला जन्म दिला आहे, यावर अनेकांचा विश्वास बसेना.

बाळाच्या जन्मानंतर दहाच दिवसांत गॅब्रिएला तिच्या जुन्या शेपमध्ये परतली होती.

गॅब्रिएला एक आफ्रिकी मॉडेल आहे. ‘सोनाली केबल’ या चित्रपटातून तिने बॉलिवूड डेब्यू केला होता. पण बॉक्स आॅफिसवर हा चित्रपट फार कमाल दाखवू शकला नाही.