जगणं शिकवणारा सुंदर प्रवास! 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'च्या सेटवरील Unseen फोटो बघा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 04:50 PM2024-07-16T16:50:22+5:302024-07-16T17:09:00+5:30

'जिंदगी ना मिलेगी दोबारा' सिनेमाला १३ वर्ष पूर्ण झाली असून सिनेमातील इमरान अर्थात फरहान अख्तरने सेटवरील खास फोटो शेअर केलेत (znmd)

'जिंदगी ना मिलेगी दोबारा' या सुपरहिट सिनेमाला १३ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने फरहान अख्तरने सेटवरील अनसीन फोटोज शेअर केलेत

या फोटोत ज्या मुलीकडे फरहान आकर्षित होतो आणि जिच्यासाठी स्पॅनिश शिकतो ती अभिनेत्री दिसतेय

'जिंदगी ना मिलेगी दोबारा'मधले कबीर-अर्जुन फोटोसाठी अतरंगी पोज देताना. अभय देओल आणि हृतिक रोशन यांचा अभिनय सर्वांना आवडला

'जिंदगी ना मिलेगी दोबारा' गाजलेली टोमॅटोची होळी. हृतिक-कतरिना-अभय-फरहान आणि फरहानची सिनेमातील मैत्रिण टोमॅटोने भरलेल्या एका ट्रकमध्ये दिसत आहे

'जिंदगी ना मिलेगी दोबारा'चं दिग्दर्शन फरहानची बहीण झोया अख्तरने केलं होतं. या फोटोत फरहान-झोया एकत्र दिसत आहेत

'जिंदगी ना मिलेगी दोबारा'मधली आयकॉनिक कार. या कारसोबत वैतागल्याचे हावभाव आणत फरहानने पोज दिली आहे

'जिंदगी ना मिलेगी दोबारा'च्या या फोटोत कतरिना फरहानची चंपी करताना दिसतेय. सिनेमात कतरिना-फरहानची वेगळीच केमिस्ट्री बघायला मिळाली