डोळे अन् हेअरस्टाइलही सेम टू सेम! हुबेहुब सलमानसारखा दिसतो 'छावा'मधला 'तो' मुलगा, सोशल मीडियावर चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 12:53 IST2025-03-04T12:50:25+5:302025-03-04T12:53:18+5:30
'छावा' सिनेमातील कलाकारांचंही कौतुक होत आहे. या सिनेमातील एका बालकलाकाराची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली आहे.

विकी कौशलचा 'छावा' सिनेमा सध्या जगभरात गाजत आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरही धुमाकूळ घातला आहे.
'छावा' सिनेमातील कलाकारांचंही कौतुक होत आहे. या सिनेमातील एका बालकलाकाराची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली आहे.
त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये त्याची हेअरस्टाइल हुबेहुबे सलमान खानसारखी दिसत आहे.
तर त्याचे डोळेही सलमानसारखेच दिसत आहेत. चाहते सलमानसोबत या चिमुकल्याची तुलना करत आहेत.
या बालकलाकाराचं नाव ध्वज गौर असं आहे. त्याने 'छावा' सिनेमात रामराजे महाराज यांच्या बालपणीची भूमिका साकारली आहे.
ध्वज गौरने याआधीही काही जाहिरातींमध्ये काम केलं आहे. इन्स्टाग्रामवर त्याचे १४०७ फॉलोवर्स आहेत.
ध्वजच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलवर 'छावा' सिनेमाबाबत अनेक पोस्ट केल्याचंही पाहायला मिळत आहे.