विकी कौशलचा बहुचर्चित 'छावा' सिनेमा किती तासांचा आहे? समोर आली मोठी अपडेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 17:36 IST2025-02-04T17:11:28+5:302025-02-04T17:36:58+5:30
'छावा' सिनेमाचा रनटाइम काय असणार आहे? जाणून घ्या एका क्लिकवर (chhaava movie)

'छावा' सिनेमाची सध्या चांगलीच चर्चा आहे. विकी कौशलने या सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारलीय तर रश्मिका मंदाना सिनेमात महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत आहे
विकी कौशल-रश्मिका मंदाना सध्या या सिनेमाचं प्रमोशन करत आहेत. रश्मिकाच्या पायाला लागलं असूनही ती आवर्जुन 'छावा'च्या प्रमोशनसाठी वेळ काढतेय
'छावा' सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा पाहायला मिळणार आहे. 'छावा' सिनेमा किती तासांचा असणार याविषयी अपडेट समोर आलीय
'छावा' सिनेमाचं पोस्टर बूक माय शोवर रिलीज झालं असून सिनेमाची वेळही नमूद करण्यात आलीय. 'छावा' सिनेमा २ तास ४१ मिनिटांचा असणार आहे
म्हणजेच तब्बल पावणेतीन तास मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा अनुभवायला मिळणार आहे.
'छावा' सिनेमात लोकप्रिय कलाकारांची फौज आहे. मुख्य कलाकारांसोबत सिनेमात विनित कुमार सिंग, आशुतोष राणा, दिव्या दत्ता हे कलाकारही ऐतिहासिक भूमिकांमध्ये बघायला मिळणार आहेत
याशिवाय 'छावा'मध्ये मराठी अभिनेता संतोष जुवेकर, शुभंकर एकबोटे, सारंग साठ्ये हे मराठी कलाकारही ऐतिहासिक भूमिका गाजवताना पाहायला मिळणार आहेत.