सलमान खानने घेतली कोरोनाची लस, आतापर्यंत या कलाकारांनी घेतली कोरोनाची लस By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 03:52 PM 2021-03-25T15:52:58+5:30 2021-03-25T15:57:58+5:30
नुकतेच सलमान खानने मुंबईतील लिलावती रुग्णालयात कोरोना व्हायरसच्या लसीचा पहिला डोस घेतला. जाणून घेऊयात आतापर्यंत कोणकोणत्या कलाकारांनी घेतली कोरोनाची लस बॉलिवूडचा दबंग खान सलमानने कोरोनाची पहिली लस घेतली आहे. नुकतेच सलमान खानने मुंबईतील लिलावती रुग्णालयात कोरोना व्हायरसच्या लसीचा पहिला डोस घेतला. जाणून घेऊयात आतापर्यंत कोणकोणत्या कलाकारांनी घेतली कोरोनाची लस
अभिनेता संजय दत्तने नुकतेच कोरोनाची लस घेतली आहे. त्याने फोटो शेअर करत ही माहिती दिली.
सलमान खानच्या आई वडिलांनी आधीच कोरोनाची लस घेतली आहे. काल सलमान खानने देखील ही लस घेतली.
अभिनेता अनुपम खेर यांनी काही दिवसांपूर्वी पहिला डोस घेतला.
सैफ अली खानने खूप आधीच कोरोनाची लस घेतली.
अभिनेता परेश रावलनेदेखील पहिला डोस घेतला आहे.
अभिनेत्री हेमा मालिनी यांनी देखील लस घेतली आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
हृतिक रोशनचे वडील आणि अभिनेते राकेश रोशन यांनीदेखील कोरोनाची लस घेतली आहे.
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनीदेखील कोरोनाची लस घेतली आहे.