KL Rahul : केएल राहुलच्या सासूबाई आहेत बॉलिवूडच्या लेडी अंबानी; सांभाळतात कोट्यवधींचा बिझनेस

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 02:17 PM2023-01-13T14:17:40+5:302023-01-13T16:02:44+5:30

केएल राहुलच्या होणाऱ्या सासूबाईंना म्हणतात बॉलिवूडची लेडी अंबानी. नवरा सुनील शेट्टीपेक्षाही त्या जास्त श्रींमत आहेत.

बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा लग्नाचा सीझन सुरू होणार आहे आणि यावेळी लग्नाची सुरूवात होणार आहे बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी याची लेक आणि अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि क्रिकेटर केएल राहुल (KL Rahul) यांच्या लग्नाने. (Photo Instagram)

बऱ्याच दिवसांपासून त्यांच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. 23 जानेवारीला त्यांचं लग्न होणार असल्याचं बोललं जात आहे. पण याबाबत अधिकृत काही सांगण्यात आलेलं नाही. येत्या काही दिवसात तारखेची घोषणा केली जाऊ शकते. (Photo Instagram)

अशात अथिया-केएल राहुलचं लग्न कुठे होणार याचीही चर्चा रंगली आहे. पण तुम्हाला माहितीय का केएल राहुलच्या होणाऱ्या सासुबाईंना म्हणजे सुनील शेट्टीची पत्नी ‘मान शेट्टी’ला बॉलिवूडमधील लेडी अंबानी म्हटलं जातं. (Photo Instagram)

सुनील शेट्टी पेक्षा त्याची बायको जास्त श्रींमत आहे. ग्लॅमरच्या झगमगाटापासून तिला दूरच राहणे आवडते. केएल राहुलच्या होणाऱ्या सासूबाई माना ही एक बिझनेस वूमन आहे. समाजसेविकाही म्हणून देखील तिची ओळख आहे. (Photo Instagram)

माना एक बिझनेस वूमन असून तिने कलाविश्वात तिची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. विशेष म्हणजे घर आणि व्यवसाय या दोघांचा ती बरोबर समतोल राखते. (Photo Instagram)

माना आणि सुनील शेट्टी यांनी मिळून S2 हा रिअल इस्टेट प्रोजेक्ट सुरु केला होता. या प्रोजेक्ट अंतर्गत त्यांनी मुंबईत २१ लक्झरी विला उभारले आहेत.(Photo Instagram)

मानाचं एक लाइफस्टाइल स्टोरदेखील आहे. यात डेकोरेशनपासून ते दैनंदिन जीवनात लागणाऱ्या काही लक्झरी वस्तूही सहज उपलब्ध होतात.(Photo Instagram)

माना 'सेव द चिल्ड्रन इंडिया' ही एनजीओदेखील चालवते. तसंच सुनील शेट्टीचं एक प्रोडक्शन हाऊसदेखील आहे. त्यामुळे ही नवरा-बायकोची जोडी वर्षाला कोटयवधींची कमाई करतात. (Photo Instagram)