"तो माझ्या ओठांवर किस करायचा", ८ वर्षांची असताना अभिनेत्रीसोबत डान्स टीचरने केलेला धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 12:25 IST2025-04-03T12:03:21+5:302025-04-03T12:25:48+5:30
लहान असताना अंजलीसोबत धक्कादायक प्रकार घडला होता. ८ वर्षांची असताना डान्स टिचरने अभिनेत्रीचा विनयभंग केला होता. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने याबाबत खुलासा केला.

'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मधून अभिनेत्री अंजली आनंदला प्रसिद्धी मिळाली. अंजली अलिकडेच डब्बा कार्टेल या वेब सीरिजमध्ये दिसली होती.
लहान असताना अंजलीसोबत धक्कादायक प्रकार घडला होता. ८ वर्षांची असताना डान्स टिचरने अभिनेत्रीचा विनयभंग केला होता. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने याबाबत खुलासा केला.
"मी तेव्हा ८ वर्षांची होते. माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर हे सगळं घडलं. त्यांनी मला सांगितलं की मी तुझ्या वडिलांसारखा आहे आणि मी त्यांच्यावर विश्वास ठेवला".
"त्यानंतर त्यांनी माझ्या ओठांवर किस केलं आणि म्हणाले की वडील असंच करतात. वडील-मुलीचं नातं काय असतं ते मला माहीतच नव्हतं. ".
"ते मला मुलींचे कपडे घालू द्यायचे नाहीत. मला केसही मोकळे सोडू द्यायचे नाहीत. मी चांगली दिसू नये म्हणून ते मला त्यांचे जुने टीशर्ट घालायला सांगायचे".
"मी ८ वर्षांची असल्यापासून ते १४ वर्षांची होईपर्यंत हे सगळं सुरू होतं. मला हे सगळं नॉर्मल वाटत होतं".
"पण, जेव्हा माझ्या बहिणीचं लग्न झालं तेव्हा माझ्या वडिलांच्या मित्राचा मुलगा लग्नाला आला होता. तो मला आवडायला लागला आणि आम्ही बोलायला सुरुवात केली".
"पण, ते माझ्या सगळ्या गोष्टींवर नजर ठेवून होते. त्यामुळे मी एका मुलासोबत बोलतेय हे त्याला कळलं".
"मला घेण्यासाठी ते माझ्या शाळेतही यायचे. सगळ्यांना हा प्रश्न पडायचा की ते नेहमी का येतात? पण कोणी हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला नाही".
"त्यानंतर माझ्या बॉयफ्रेंडने मला या सगळ्यातून बाहेर काढलं", असं अंजलीने सांगितलं.